मुख्याध्यापक अब्दुल एजाज राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कारने सन्मानित

मुख्याध्यापक अब्दुल एजाज राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कारने सन्मानित

जि.प.उर्दू कन्या शाळा पाचोरा येथे कार्यरत कृतीतज्ञ मुख्याध्यापक अब्दुल एजाज अब्दुल रउफ यांना राष्ट्रीय जीवन गौरव कृतज्ञता पुरस्कारने सन्मानित करण्यात आला. नाशिक येथील कार्य करणारी भावना आणि युनिटी शैक्षणिक सामाजिक संस्था दरवर्षी आपले देशासाठी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उत्तम कार्य करणारे 100 लोकांना हे पुरस्कारने सन्मानित करतो. आपल्या जळगांव जिल्ह्यातून इलियास खान व अब्दुल एजाज हया दोन शिक्षकांना हा पुरस्कार मिळालेला आहे.मुख्याध्यापक अब्दुल एजाज यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य मुळे त्यांना हे पुरस्कार देण्यात आला. उपक्रमशील अब्दुल एजाज ने पाचोरा शहरात अनेक शैक्षणिक व सामाजिक कार्य केलेले आहे. हल्ली त्यांनी आपल्या शिक्षक बांधवांच्या सहाय्याने वर्गणी गोळा करून मुस्लिम गोर गरीब विद्यार्थ्यांसाठी मौलाना अबुल कलाम आझाद हॉल बनवलेला आहे. तो महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शैक्षणिक संघटनाचे उर्दू तालुकाप्रमुख असून उर्दू माध्यमांचे हक्क प्राप्त करण्यासाठी सदैव सक्रिय राहतो. शाळेत मुख्याध्यापकचा चार्ज घेतल्या पासून शाळेत दर्जेदार शिक्षण देण्यासाठी व शैक्षणिक दर्जा उंचवण्या साठी प्रयत्न करतो.
त्यांना हा पुरस्कार मिळाल्याने मुस्लिम समाजात आनंदच्या वातावरण आहे तसेच शिक्षक मित्र परिवार यांच्याकडून अभिनंदन होत आहे.
तो भविष्यात अजून हि सामाजिक व शैक्षणिक कार्य करून आपल्या देशाला प्रगत बनवण्यासाठी प्रयत्न करील अशी अपेक्षा आहे.