पत्रकार प्रकाश तेली यांच्या “वोट-4” काव्य संग्रहाचे गोव्याचे मुख्य निवडणुक अधिकारी रमेश वर्मा यांच्या हस्ते प्रकाशन
जळगाव :- सामाजिक व संवेदनशील कवी लेखक गीतकार व पत्रकार प्रकाश रामदास तेली यांच्या वोट-4 ह्या हिंदी काव्य संग्रहाचे प्रकाशन गोव्याचे मुख्य निवडणुक अधिकारी रमेश वर्मा यांच्या हस्ते पणजी (गोवा) येथे झाले प्रकाश तेली यांनी सुदृढ़ लोकशाहीसाठी मतदान करणे किती गरजेचे आहे त्याचे महत्व ह्या काव्यसंग्रहात अधोरेखित केलेले आहे. सर्वाना मतदानाचे महत्व समझावे व मतदान जनजागृतीसाठी प्रकाश तेली यांनी मतदानावर 200 पेक्षा जास्त कविता व 700 पेक्षा आधिक घोषवाक्य लिहिलेले आहेत त्यांच्या कविता ह्या प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करणार्या आहेत ह्या सर्व कविता लिहिण्यामागे समस्त देशवासियांना जागृत करणे हाच त्यांचा मुख्य उद्देश आहे असे प्रकाश तेली यांनी सांगीतले
प्रकाश तेली यांनी ह्यापुर्वीचा मतदानावर सर्वाधिक कविता व घोषवाक्य लिहिण्याचा विश्वविक्रम केलेला असून त्यांच्या कार्याची विविध रेकॉर्ड बुक्स मध्ये नोंद झालेली आहे त्यांच्या इतक्या कविता व घोषवाक्य हे एका ही साहित्यिक व लेखकानी आज पर्यंत लिहिलेल्या नाहीत
प्रकाश तेली यांचे आतापर्यंत वोट ह्या विषयावर वोट, वोट -2, आणि वोट -3 हे काव्य संग्रह प्रकशित झालेले असून लवकरच वोट – 5 वाचकांकरिता आणणार असल्याचे ही त्यांनी सांगितले
प्रकाश तेली यांचे बालविवाह, सड़क सुरक्षा, बढ़ती जनसंख्या, किसान, नदी भारत की जलधारा, खाद्य सुरक्षा हे काव्य संग्रह प्रकाशित झालेले असून लवकरच आता वीज बचती वरील काव्य संग्रहाचे काम सुरु आहे असे ही प्रकाश तेली यांनी सांगितले भविष्यात वोट के कोट्स हे पुस्तके सुद्धा काढणार असल्याचे प्रकाश तेली यांनी सांगीतले.
मतदान जनजागृती साठी प्रकाश तेली यांनी लिहिले आहेत अनेक गाणे भविष्यात बनविणार शार्ट फिल्म:-
मतदाता शिक्षा आणि जागरूकता अभियानासाठी तसेच मतदानाचे महत्त्व सहज व सोप्या भाषेत लक्ष्यात यावे याकरिता प्रकाश तेली यांनी अनेक गाणी लिहिलेली असून भविष्यात शार्ट फिल्म देखील बनविणार असल्याचे त्यांनी सांगीतले
मुख्य निवडणुक अधिकारी रमेश वर्मा यांच्या कडून प्रकाश तेली यांच्या कार्याचे कौतुक :-
मतदाना सारख्या अत्यंत महत्वपूर्ण विषयावर लिखाण केल्याबद्दल मुख्य निवडणुक अधिकारी रमेश वर्मा यांनी प्रकाश तेली यांच्या कार्याचे कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या
प्रकाश तेली यांच्या काव्य संग्रहाचे पंतप्रधान कार्यालय, उपराष्ट्रपति कार्यालय, राज्यपाल अनेक केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ज्ञानपीठ व पदमश्री पुरस्कार प्राप्त लेखक व अनेक महनीय व्यक्तीनी गौरव केला आहे
प्रकाश तेली यांनी लिहिले 5000 पेक्षा जास्त कविता व 6000 पेक्षा जास्त घोषवाक्य
प्रकाश रामदास तेली यांनी विविध सामाजिक आणि राष्ट्रीय विषयांवर 5000 पेक्षा जास्त कविता व 6000 पेक्षा जास्त सामाजिक कोट्स लिहिलेले आहेत कविता व कोट्स लिहून समाजाला जागृत करण्याचे अनोखे कार्य प्रकाश तेली हे करीत आहेत.