अंबा माता दुष्ट प्रवृतींचा नाश कर… श्री.गो. से. हायस्कूल च्या सुबोध कांतायन सरांच्या चित्रातून संदेश
पाचोरा( प्रतिनिधी)
नवरात्री हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक वार्षिक हिंदू सण.नवरात्र म्हणजे नऊ शक्तींच्या मिलनाचा उत्सव,.
नवरात्री सणाचे औचित्य साधून श्री गो से हायस्कूल चे कलाशिक्षक सुबोध कांतायन यांनी शाळेच्या दर्शनी फलकावर मातेचे मनमोहक,सुंदर रूप साकारले.
चित्रातील संदेश प्रत्येक स्त्री ला आदिशक्ती देवी आंबेचे रूप घेण्यासाठीची ऊर्जा देतंय
महिलांनकडे उपभोगाचे साधन म्हणून बघायची व्याभिचारी दृष्टी निर्माण झाली आणि ती दृष्टीच महिलावरील अत्याचार आणि लैंगिक शोषणाला कारणीभूत ठरतो आहे. स्त्रियांवर, बालिकांवर अत्याचार होतात.
निर्भया, तसेच नुकतीच भडगाव मधील गोंडगावातील बालिकेवरील ताजी दुःखद घटना……
चित्रातील बालिका आदिशक्ती अंबेला शरण आली आहे. अत्याचारी दुष्टांवर तुझ्या रुद्र अवताराचा प्रकोप होऊ दे. त्यांना तुझ्या ज्वालांनी जाळून टाक.चित्रात ज्वालांमधून त्रिशूल आणि सिंह निघताना दिसून येतोय आणि दुष्ट प्रवृतीवर हल्ला करत आहे.. कांतायन सरांनी चित्रातील बारकावे दाखविण्याचा पूर्ण प्रयन्त केलाय त्यातील एक बारकावा तो म्हणजे मुलीला नजर लागू नये म्हणून पायात काळा दोरा बांधला जातो तेच ह्या चित्रातील मुलीच्या पायात दिसून येतोय. चित्रातील बरंच काही सांगता येईल पण प्रत्यक्ष रसिकांनी चित्र बघून त्यातील बारकावे शोधावे प्रत्येक सणांना, चांद्रयान मोहीम,विविध जयंतीना सरांचे चित्र फलकावर साकारले जाते. दर प्रसंगी शिक्षक बांधवाना विद्यार्थ्यांना, तालुक्यातील रसिकांना चित्राची आतुरता असते
पी. टी. सी.संस्थेचे चेअरमन संजयजी वाघ,संस्थेचे व्हा.चेअरमन व्ही.टी.जोशी, शालेय समिती चेअरमन खलील देशमुख, संस्थेचे ज्येष्ठ संचालक भोलाआप्पा सतीष चौधरी, शाळेचे माजी पर्यवेक्षक शांताराम चौधरी ,बी. एस. पाटील आप्पा या मान्यवरांनी संदेशपूर्ण चित्र रेखांकित केल्याबददल सरांच्या कलेचे कौतुक व शुभेच्छा दिल्यात.
या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पी.एम.वाघ ,उपमुख्याध्यापक एन. आर.ठाकरे,पर्यवेक्षक आर.एल. पाटील ,ए.बी.अहिरे, सौ.ए.आर.गोहिल , तांत्रिक विभाग प्रमुख एस.एन.पाटील,किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष.बाविस्कर ,कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.