‘चोपडा महाविद्यालयात ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’ उत्साहात साजरा’
चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे, दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील मानसमित्र समुपदेशन केंद्र व मानसशास्त्र विभाग यांच्यातर्फे ‘जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त’ व्याख्यान व ‘पोस्टर प्रदर्शन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याच्या माजी शिक्षणमंत्री कै.मा.ना.अक्कासो.सौ. शरच्चंद्रिका सुरेश पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. एन.एस.कोल्हे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून एस.पी.डी.एम. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शिरपूर येथील प्रोफेसर डॉ. एन.एस. डोंगरे हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य प्रा.डॉ. के. एन.सोनवणे, समन्वयक डॉ. शैलेश वाघ, पर्यवेक्षक ए. एन. बोरसे, समन्वयक पी. एस. पाडवी, एस. बी. देवरे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आर.आर.पाटील म्हणाले की, ‘सध्याच्या युगात शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. समाजाच्या सर्वच घटकांचे मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी जनजागृती करणे हा या कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश आहे’.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते प्रोफेसर डॉ. एन. एस.डोंगरे यांनी ‘मानसिक आरोग्य संवर्धन काळाची गरज’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी आपल्या मनाचे स्वास्थ्य चांगले कसे राहील याविषयी माहिती दिली तसेच ‘आज कौटुंबिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य, आर्थिक आरोग्य, अध्यात्मिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्याची काळजी घेणे ही आवश्यक आहे. समाजात जीवन जगत असतांना मानसिक आरोग्याकडे आपले दुर्लक्ष होत चालले आहे. व्यक्तीने आपले मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सकारात्मक जीवनशैलीचा योग्य वापर केला पाहिजे. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य कसे महत्वाचे आहे’ असेही ते यावेळी
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उपप्राचार्य एन.एस.कोल्हे म्हणाले की, ‘सध्याच्या चुकीच्या आधुनिक जीवनशैलीमुळे व्यक्तीचे मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे. निरोगी मानसिक आरोग्य जोपासताना व्यक्तीने सकारात्मक विचारसरणी, योग्य आहार, व्यायाम तसेच आपले छंद जोपासले पाहिजेत’.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रेरणा अमोल बडगुजर हिने केले तर आभार एस.बी. देवरे यांनी मानले. या कार्यक्रमानिमित्त आयोजित पोस्टर सादरीकरण स्पर्धेप्रसंगी महाविद्यालयातील सौ. एम. टी. शिंदे, डॉ. व्ही. आर. कांबळे, डॉ. डी. पी. सपकाळे, डॉ.एम. एल. भुसारे, डॉ. डी. डी. कर्दपवार, एम. बी. पाटील, सौ. एस. बी.पाटील, डॉ.एस. एन. पाटील, एस. जी. पाटील, बी.एच. देवरे यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर बंधू-भगिनी तसेच बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मानसमित्र मंडळाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.