होऊ द्या चर्चा कार्यक्रमातून बाळद आणि नाचणखेडा येथे सौ. वैशाली सुर्यवंशी यांनी मोदी सरकारचा घेतला समाचार

होऊ द्या चर्चा कार्यक्रमातून बाळद आणि नाचणखेडा येथे सौ. वैशाली सुर्यवंशी यांनी मोदी सरकारचा घेतला समाचार

पाचोरा: दिनांक 06/10/2023 रोजी पाचोरा तालुक्यातील बाळद बु. आणि नाचणखेडा येथे 06:30 ते 09 दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख तथा मा. लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आदेशान्वये महाराष्ट्रभर सुरू असलेल्या *होऊ द्या चर्चा* अभियानांतर्गत शिवसेना नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अरुण पाटील शहर प्रमुख पाचोरा अनिल सावंत युवासेना जिल्हा उपप्रमुख संदीप जैन, यांच्या प्रमुख उपस्थित होऊ द्या चर्चा कार्यक्रम संपन्न झाला. होऊ द्या चर्चा कार्यक्रमावेळी सौ. वैशालीताई सुर्यवंशी या म्हणाल्या की, सन 2014 मध्ये झालेल्या लोकसभा पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळी माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जी आश्वासने नवनिर्माण भारताचे स्वप्न उभे केले होते ते आज दहा वर्षाच्या काळात जनतेचा भ्रम निराश झाला. मतदार राजांची घोर फसवणूक झाली, काळे धन भारतात आले नाही, पंधरा लाख रुपये नागरिकांच्या खात्यात जमा केले गेले नाही, रोजगार उपलब्ध केला नाही, प्रचंड प्रमाणात बेरोजगारी वाढली, सुशिक्षित तरुणांच्या जीवनात नैैराश्य निर्माण झाले, नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी पासून वंचित ठेवले, कर्ज वसुली सक्तीची आहे म्हणून आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे, उत्पन्नाला हमीभाव नाही, शेतकऱ्यांच्या पिकाला दुधाला भाव नाही, शेतकऱ्यांचे पांढरे सोने कापूस पिकाला भाव नाही, खरेदी केंद्र बंद पडलेले, आजही कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे, महागाई प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे, पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला पोहोचले, गरिबांनी चूल कशी पेटवावी? हा प्रश्न उभा राहिला आहे, आरोग्याच्या सुविधा कोळमळल्या, इमारती उभ्या केल्यात, डॉक्टर्स, नर्स इतर स्टाफ भरती नाही, साथीच्या लसीकरणाचे औषधे उपलब्ध नाहीत, सर्पदंश, श्वान दंश यावरील औषधे सरकारी रुग्णालयात नाही सरकारी दवाखान्यांचे फक्त इमारतीचे टोलेजंग जंगले उभे केले, नवीन धोरणे नव्या योजना फसव्या असून अंबलबजावणी शून्य आहे, महिला अत्याचार, बलात्कार, विनयभंग प्रमाण वाढले असून गुन्हेगारांवर कठोर कार्यवाही नाही हे श्रीरामाचे नाव घेऊन राज्य करण्याचं दुर्दैव आहे भाजपा सरकारचं. महाराष्ट्रात महा आघाडीचे शासन होते मा. श्री शिवसेनाप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते माननीय उद्धवजी ने घेतलेले निर्णय तमाम जनतेच्या हिताचे होते. महाराष्ट्रातील बळीराजाला भक्कम आधार देण्यासाठी कर्जमुक्त करण्यासाठी आत्महत्येचे प्रमाण रोखण्यासाठी बिना अटी शर्तीची सरसकट कर्जमाफी देऊन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले. कापूस व इतर पिकांना हमीभाव दिले. कोरोना हे जागतिक महामारी असताना कुटुंब प्रमुख म्हणून भूमिका निभावून लाखो नागरिकांचे प्राण वाचवले. औषधोपचार ऑक्सिजन पुरवून उपलब्ध करून सुनियोजित बंदाचे नियोजन करून कोरोना महामारी सोबत यशस्वी लढा दिला व जगातील आदर्श मुख्यमंत्री ठरले तरी देखील भाजपाने कटकारस्थान करून सत्तांतर घडवले. हे महापाप केले येणाऱ्या 2024 मध्ये या पापाचा बदला घ्यावा लागेल भाजपापासून देशाला वाचवावे लागेल भाजपा मुक्त देश उभा करण्याची प्रतिज्ञा घेऊया असं ताईसो यांनी प्रतिपादन केले. यावेळी ताईसो यांनी स्थानीय मुद्दे यांच्यावर पण समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्याशी चर्चा केली. सूत्रसंचालन शशी पाटील यांनी केले. राजेंद्र राणा यांनी आपल्या विचार मांडले आणि भूपेश सोमवंशी यांनी आभार व्यक्त केले यावेळी नरेंद्र सिंग सूर्यवंशी, तीलोत्तमा मौर्य, जयश्री येवले, अरुण सोमवंशी, आनंद पाटील, डॉक्टर निलेश पाटील. महारु पाटील, रामकृष्ण गटरी, मनोज पाटील, बाळू प्रकाश मोरे, सुधाकर गदरी, रामराव चव्हाण, शशिकांत पाटील, शिवाजी ठाकूर, अतुल अतुल, पाटील संदीप, बाळू अण्णा पाटील, युवराज नाईक, पंडितराव पाटीलश्रीराम धोबी, लक्ष्मण बागुल, शकील दादा, रविंद्र सोमवंशी, प्रदीप सोमवंशी, जयकुमार सोमवंशी, सोनिराम मोरे, भीमसिंग सोमवंशी, मंगा सीताराम मोरे, सचिन सोमवंशी, शिवाजी सोमवंशी, सतीश मोरे, जितेंद्र सोमवंशी, धर्मराज मगर, सुनील आत्माराम, दिलीप मोरे, अनिल बाबा, प्रवीण सोमवंशी, किशोर सोमवंशी, शाहरुक शेख,कैलास फ़क़ीरा, सुनील सोमवंशी, दिलीप सोमवंशी, सुनील बोरसे, शालीक सोमवंशी सह शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व ज्येष्ठ व श्रेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.