मध्य प्रदेशातील अभियंते व कर्मचारी यांनी पेन्शन व इतर मागण्यासाठी सुरू केलेल्या संपात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचा पाठिंबा

मध्य प्रदेशातील अभियंते व कर्मचारी यांनी पेन्शन व इतर मागण्यासाठी सुरू केलेल्या संपात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचा पाठिंबा.

———————————-

मध्य प्रदेश वीज उद्योगात कार्यरत असलेले का वीज कर्मचारी व अभियंते ४ ऑक्टोबर २०२३ पासून बेमुदत संपावर गेले आहेत. मध्य प्रदेश वीज कर्मचारी,अभियंते कृती समितीच्या मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असून त्या सोडविण्यासाठी प्रशासन चर्चा टाळटाळ करत आहे. मध्यप्रदेश सरकारचे व वीज कंपन्या प्रशासनाचे हे धोरण कर्मचाऱ्यांच्या अधिकाराचे हनन करणारे आहे. उत्तर प्रदेशातील सर्व वीज कामगार व अभियंते यांना सरकारी तिजोरीतून पेन्शन दिले जाते त्याप्रमाणे पेन्शन सरकारी तिजोरीतून देण्याची मागणी मध्यप्रदेश मधील वीज कर्मचारी करत आहे.संपाच्या नोटीस मध्ये नमूद केलेल्या मागण्यांबाबत व्यवस्थापन चर्चा करत नाही. मध्य प्रदेश सरकारने एस्मा लागू केला आहे. विविध माध्यमांद्वारे संपकर्‍यांवर दबाव आणला आहे. सर्व तांत्रिक कर्मचारी व अभियंते संपावर गेल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये वीज निर्मिती व वीज पुरवठा प्रभावित झाला आहे. शासन व वीज व्यवस्थापनाला आगाऊ सूचना देऊनही संप मिटवण्याबाबत कोणतीही चर्चा केली जात नाही.

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन सघटना
उर्जाक्षेत्राचे व्यवस्थापन व ऊर्जामंत्री यांना चर्चेची दारे बंद करू नये व मागण्या सामंजस्याने चर्चा करुन सोडवण्याचे आवाहन करत आहे. संपकरी कामगार व अभियंता यांच्यावरील कारवाई थांबवावी.असे न झाल्यास महाराष्ट्रील संघटनेच्या सभासदाना मध्य प्रदेशच्या संपाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रभर आंदोलनाची हाक द्यावी लागेल. महाराष्ट्रातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवार दिनांक ११.१०.२०२३ रोजी मध्यप्रदेश वीज कर्मचाऱ्यांच्या संपात पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील वीज कर्मचाऱ्यांनी निदर्शने करावी असे आव्हान संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड मोहन शर्माजी, सर्च कार्याध्यक्ष सि.एन.देशमुख, सरचिटणीस कॉम्रेड कृष्णा भोयर,अतिसरचिटणीस महेश जोतराव यांनी केले आहे.
कळावे.
कृष्णा भोयर
सरचिटणीस महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन*