श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे सन्मान व कौतूक सोहळा संपन्न.
पाचोरा ( प्रतिनिधी)
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था. संचलित श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे आज संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांनी श्री. गणेशाचे उत्कृष्ट चित्राचे रेखाटन दर्शनी फलकावर केल्याबद्दल शाळेतील चित्रकला शिक्षक सुबोध कांतायन, प्रमोद पाटील, सौ. ज्योती ठाकरे मॅडम व विद्यार्थ्यांनी केलेल्या कलाकृतीचे कौतुक केले. विशेषतः कलाकृतीमध्येशाळेतील कलाशिक्षक सुबोध कांतायन यांनी केलेल्या शंकर पार्वती व मांडीवर बसलेला गणपती या कलाकृतीचे व यु ट्युब वरील व्हिडिओचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.श्री.गो.से .हायस्कूल शाळेच्या लोगो अक्षर आणि गणपती बनवल्याबद्दल प्रमोद पाटील कलाशिक्षक यांच्या अभिनंदन केले, शाळेतील फलकावर तृणधान्य या विषयांतर्गत गणपती साकारल्याबद्दल कला शिक्षिका ज्योती पाटील. यांना शुभेच्छा दिल्या. . महेश कौंडिण्य यांना उत्कृष्ट पत्रकारितेचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा चेअरमन संजय वाघ.हस्ते शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शालेय समिती चेअरमन खालील देशमुख, संस्थेचे संचालक सतीश चौधरी, मुख्याध्यापिका सौ.पी. एम.वाघ , उप मुख्याध्यापक एन.आर.ठाकरे , पर्यवेक्षक आर.एल. पाटील ,ए.बी.अहिरे, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर, तांत्रिक विभाग प्रमुख एस.एन. पाटील,सांस्कृतिक विभाग प्रमुख आर. बी. तडवी,कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर,शिक्षक व शिक्षकेतर बंधू,भगिनी उपस्थित होते. या कलाकृती पाहून विद्यार्थी आपल्या चित्रकलेच्या वहीमध्ये चित्र काढू लागले व आनंदित झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.बी.बोरसे यांनी केले. तर आभार प्रमोद पाटील यांनी मानले.