महात्मा फुले शिक्षक परिषदेची जळगाव जिल्हा कार्यकारणी जाहीर

महात्मा फुले शिक्षक परिषदेची जळगाव जिल्हा कार्यकारणी जाहीर

जळगाव—
महाराष्ट्रातील शिक्षकांच्या न्याय, हक्कासोबतच गुणवत्ता वाढ व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेची जळगाव जिल्हा कार्यकारिणी आज घोषित करण्यात आली आहे. संघटनेचे प्रदेश अध्यक्ष व्यंकटराव जाधव (नांदेड) यांनी जळगाव जिल्हा अध्यक्षपदी शिवाजी शिंदे यांची तर सचिवपदी प्रवीण मोरे यांची निवड केली आहे. संघटनेची जळगाव जिल्हा कार्यकारणी पुढील प्रमाणे-

जिल्हाध्यक्ष- शिवाजी भास्कर शिंदे (पाचोरा), जिल्हा सचिव – प्रवीण काकाजी मोरे (चाळीसगाव), जिल्हा उपाध्यक्ष – रावसाहेब बंकट जगताप (चाळीसगाव), भावेश भीवसन अहिरराव (पाचोरा), प्रा. डॉ. अनिता अविनाश कोल्हे ( जळगाव), श्रीमती आशा विलास जाधव (पाचोरा). जिल्हा सहसचिव- चंद्रकांत बाजीराव पाटील (पाचोरा), दिनेश अनंतराव जगताप (चाळीसगाव), आणि कोषाध्यक्ष विनोद अमृत पाटील (जामनेर).

जिल्हा संघटक पदी सुशील बापूराव सोनवणे (चाळीसगाव), सागर गंगाराम सोमवंशी(भडगाव), भगतसिंग शालिग्राम पाटील (भडगाव), प्रवीण ज्ञानेश्वर मराठे (एरंडोल), श्रीमती अश्विनी योगेश कोळी (यावल) व श्रीमती मंगल विश्वनाथ म्हेत्रे (जामनेर) तसेच जिल्हा कार्यवाह पदी रुपेश यशवंत पाटील (चाळीसगाव) आणि जिल्हा समन्वयक पदावर अजय साहेबराव शिंदे (जळगाव) लक्ष्मीकांत नारायण महाजन (जळगाव), नितीन रोहिदास पाटील (चोपडा), यांची नियुक्ती आहे.

संघटनेचे विधी सल्लागार म्हणून अमळनेरचे ॲड.गोपाल शालिग्राम सोनवणे यांची तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून प्रा. सी.एन. चौधरी (पाचोरा) व मिलिंद प्रभाकर पाटील (अमळनेर) यांची नियुक्ती आहे. संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून माजी अध्यक्ष नारायण दशरथ महाजन (चाळिसगाव) तसेच शिक्षक नेते रवींद्र मुकुंदराव सोनवणे (भडगाव) महेश विठ्ठलराव पाटील (जळगाव) , गुणवंतराव वामनराव पवार (पाचोरा) किसन तुकडू भारुळे (जळगाव), श्रीमती उज्वला अशोक महाजन (पाचोरा) यांचे सहकार्य लाभणार आहे. तर कार्यकारणी सदस्यांमध्ये कुंदा पांडुरंग पाटील (पाचोरा), प्रा. ऐश्वर्या राजेंद्रसिंह परदेशी (जळगाव), आणि श्रीमती मीना लीलाधर हिवरे(पाचोरा), यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे.