_जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे दैदिप्यमान यश….!!!!_
*भडगाव (प्रतिनिधी) -* कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,*गोपीचंद पुना पाटील,कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथील तब्बल ४ पहेलवानांनी जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,तर्फे आयोजित तसेच कमल लॉन्स,एरंडोल तथा तालुका क्रीडा संकुल, चाळीसगाव,येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत १७ व १९ वर्षाआतील गटात विजेतेपद प्राप्त केले असून त्यांची येवला जि.नाशिक येथे पार पडणाऱ्या नाशिक विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्पर्धेतील यशस्वी पहेलवान…!!!!
१) जयदीप कैलास सोनवणे (१७ वर्षे मुले,फ्रीस्टाईल,प्रथम,५५ कि.)
२) स्वराज प्रल्हाद चौधरी (१७ वर्षे मुले ग्रीकरोमन,प्रथम,५५ कि.)
३) कु.पायल कैलास सोनवणे (१९ वर्षे मुली,प्रथम,५० कि.)
४) धीरज शरद पाटील (१९ वर्षे मुले,फ्रीस्टाईल,५५ कि.)
यशस्वी खेळाडूंना आदर्श क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे,प्रा.रघुनाथ पाटील,प्रा.प्रेमचंद चौधरी,यांचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडूंच्या या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील,सचिव डॉ.पुनमताई पाटील,अव्वर सचिव प्रशांतराव पाटील,प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार,प्र.कार्यवाहक रघुनाथ पाटील यांनी तसेच महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधु-भगिनींनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.