विश्वास साळुंखे आदर्श प्राचार्य पुरस्काराने सन्मानित
पाचोरा – धुळे येथील निसर्ग मित्र समिती” तर्फे प्रत्येकवर्षी शैक्षणिक, सामाजिक तसेच पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते
यावर्षी देखील सदर पुरस्कार वितरण सोहळा धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संस्थापक अध्यक्ष श्री बापूसाहेब एस एम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली धुळे येथील पद्मश्री हॉल येथे संपन्न झाला
या प्रसंगी भडगाव येथील सुमनताई गिरधर पाटील माध्यमिक विद्यालय & सौ. जयश्री गणेश पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विश्वासराव साळुंखे ( व्ही एस साळूंखे ) यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे यांच्या हस्ते “महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक शिक्षण संचालक गोविंद साहेब, निसर्ग मित्र समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे निसर्ग मित्र समितीचे अध्यक्ष बापूसाहेब डी बी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
विश्वासराव एस साळुंखे यांना “राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक ” सन्मान प्राप्त झाल्या बद्दल पाचोरा तालुका सह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ.दिलीपभाऊ वाघ, चेअरमन नानासाहेब संजय वाघ, व्हा. चेअरमन नानासाहेब व्हि.टी.जोशी, मानद सचिव अँड महेशदादा देशमुख, शालेय समिती चेअरमन दत्ताआबा पवार, कनिष्ठ महाविद्यालय चेअरमन विनयबाबा जकातदार, किमान कौशल्य चेअरमन विजयनाना देशपांडे यांनी अभिनंदन केले
शालेय परिवारातील सर्व, पदाधिकारी शिक्षक बंधु- भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचेतर्फे मनःपूर्वक अभिनंदन.