जलजीवन योजने अंतर्गत बुडकी ग्रामपंचायतीला 5 नवीन पाण्याचे टाकी चे उद्धघाटन

जलजीवन योजने अंतर्गत बुडकी ग्रामपंचायतीला 5 नवीन पाण्याचे टाकी चे उद्धघाटन करण्यात आले…

(प्रतिनिधी)

शिरपुर : तालुक्यातील बुडकी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नवागांव, बुडकी, चिंचपाणी, जुनी बुडकी, लालसिंग पाडा गावात जलजीवन योजनेचा निधीतुन सर्व गावापाड्यात नवीन पाण्याचा टाकीचे उद्घाटन करण्यात आले आहे…
मागील काही वर्षांपासून वरील सर्व पाड्यातील गावकऱ्यांना पाण्याची समस्या निर्माण होत असल्याने सर्व गावकरी व सरपंच यांनी नवीन पाण्याचा टाकीसाठी पंचायत समिती ला भेट दिली असता हे काम जिल्हा परिषद स्तरावरील असल्याने त्यांनी सांगितले त्यासंदर्भात समस्त ग्रामस्थांनी जिल्हा परिषद धुळे येथे प्रस्ताव सादर करण्यात आला होता त्याचा पाठपुरावा सौ. जताबाई रमण पावरा (जि.प.सदस्य) यांनी शासनाला वेळोवेळी केल्याने अखेर जलजीवन योजने अंतर्गत बुडकी ग्रामपंचायत मध्ये येणारे 5 पाड्यासाठी नवीन पाण्याची टाकी मंजुरी देऊन आली त्याचे उद्घाटन आज श्री. रमण पावरा (जि.प.सदस्य) व श्री.विशाल पावरा (पं.स.सदस्य) यांच्या उपस्थितीत करण्यात आले…
आभार जितेंद्र पावरा यांनी केले….
या वेळी : विश्वास पावरा (सरपंच), जितेंद्र पावरा (युवा कार्यकर्ता), सचिन पावरा (उपसरपंच), अनिल पावरा, बाजीराव पावरा, तसेच गावातील ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते…..