डॉ राहुल झेरवाल यांच्या सिद्धिविनायक हॉस्पिटल चे पाचव्या वर्षात पदार्पण
पाचोरा, दि 26
पाचोरा शहरातील कृष्णपुरी भागातील डॉ राहुल झेरवाल यांच्या सिद्धिविनायक हॉस्पिटल ला आज 4 वर्ष यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहेत व आज 5 व्या वर्षात पदार्पण होत आहे.
पाचोरा शहरात कृष्णापुरी भागात डॉ राहुल प्रभाकर झेरवाल हे मागील 4 वर्षांपासून शहर व तालुक्यातील रुग्णांना सेवा देत आहेत. गेल्या 4 वर्षात कित्येक रुग्णांना त्यांनी पीडामुक्त केले आहे. या सिद्धिविनायक हॉस्पिटल मद्दे अनेक आजारांवर उपचार केला जातो. अनेक प्रकारच्या अत्यावश्यक सेवांचा यात समावेश आहे.
ऐन कोरोना काळात केली नॉन कोविड रुग्णांची सेवा
कोरोना काळात जवळ जवळ सर्व हॉस्पिटल कोरोना बाधित रुग्णांसाठी राखीव झाले असतांना सिद्धिविनायक हॉस्पिटल चे संचालक डॉ राहुल झेरवाल यानी नॉन कोविड रुग्णांना सेवा दिली. कोरोना काळात सर्वच रुग्ण अतिशय भयभीत झाले असतांना नॉन कोविड रुग्णांना येथे सेवा मिळाल्याने रुग्णांनी समाधान व्यक्त केले
अविरत सेवा देण्याचा प्रयत्न करणार: डॉ राहुल झेरवाल
4 थ्या वर्धापन दिनाविषयी सिद्धिविनायक हॉस्पिटल च्या डॉ राहुल झेरवाल यांच्याशी सपर्क केला असता त्यांनी रुग्णांची अविरत सेवा करणार असल्याचे सांगितले तसेच रुग्णांचा त्रास दूर करने हे माझे कर्तव्य असून मी गोर गरीब, गरजूंच्या मदतीसाठी व उपचारासाठी सदैव तत्पर व तयार असेल असे मत त्यांनी व्यक्त केले