चोपडा महाविद्यालयात ‘क्रांती दिन’ व ‘जागतिक आदिवासी दिन’ उत्साहात साजरा

चोपडा महाविद्यालयात ‘क्रांती दिन’ व ‘जागतिक आदिवासी दिन’ उत्साहात साजरा

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील , विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, इतिहास विभाग तसेच मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.९ ऑगस्ट २०२३ रोजी ‘क्रांती दिन’ व ‘जागतिक आदिवासी दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांमार्फत ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या उपक्रमांतर्गत सर्व विद्यार्थी व प्राध्यापक बंधू -भगिनी यांनी आपल्या देशाचे संरक्षण आणि विकास कार्यात मोलाची भर घालण्याबाबतची *पंचप्राण शपथ* घेतली.
कार्यक्रमात सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी व आदिवासी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख सौ.सुनिता पाटील यांनी केले.
या प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी तसेच उपप्राचार्य एन. एस. कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ. के. एन सोनवणे, समन्वयक डॉ. एस. ए. वाघ, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. के. लभाने, एन. सी. सी. विभाग प्रमुख डॉ. बी. एम. सपकाळ, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. डी. डी. कर्दपवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी श्वेता धनगर, प्रियंका बावीस्कर, गंगा करंकाळे, दिपाली राजपूत, किर्ती पाटील व तनुश्री सनेर आदी विद्यार्थिनींनी क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व तसेच स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या थोर वीर महापुरुषांच्या जीवन कार्याचा परिचय उपस्थितांना आपल्या भाषणातून करून दिला.
याप्रसंगी उपप्राचार्य एन. एस. कोल्हे यांनी कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करत
आगामी काळात वाचन वाढवून वैचारिक दृष्टीने समृद्ध होण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोना राजपूत हिने केले तर आभार डॉ. डी. डी. कर्दपवार यांनी मानले.
या कार्यक्रमाप्रसंगी सौ. माया शिंदे, डॉ. ए. बी. सूर्यवंशी, डॉ. एम. एल. भुसारे , डॉ. आर. आर. पाटील, गोपाल बडगुजर, एस. जी. पाटील व बी. एच. देवरे यांचे सहकार्य लाभले. यावेळी बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.