पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो .से. हायस्कूल, पाचोरा
येथे आज दिनांक 8 ऑगस्ट 2023 मंगळवार रोजी आमच्या शाळेत “संयुक्त राष्ट्र संघाने” ‘२०२३’ हे “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून जाहीर केले आहे . त्यानिमित्ताने आमच्या शाळेत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्यां विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी व्याख्याते म्हणून आमच्या पाचोरा नगरिचे प्रसिध्द डॉक्टर गोल्ड मेडलिस्ट “आयुर्वेदाचार्य, मा.डॉ. संजय जी माळी ,(श्रीहरी आयुर्वेद चिकित्सालय, पाचोरा.) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . डॉक्टर साहेबांनी विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत आहारातील तृणधान्याचे महत्त्व पटवून दिले. वाढते फास्ट फुडचे प्रमाण आरोग्यासाठी कसे घातक आहे हे ही विद्यार्थ्यांसमोर त्यांनी मनोरंजक पद्धतीने मांडले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या आमच्या शाळेच्या मा. मुख्याध्यापिका सौ. प्रमिलाताई एम.वाघ मॅडम यांनीही आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना विविध उदाहरणे देऊन पौष्टिक आहाराचे महत्व पटवून दिले. व्यासपिठावर या कार्यक्रमाला ज्यांचे अनमोल मार्गदर्शन आम्हाला लाभले ते आमच्या शाळेचे मा. उपमुख्याध्यापक एन. आर. ठाकरे , पर्यवेक्षिका सौ ए. आर. गोहील , ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एस.एस.पाटील , उपस्थित होते.मंचावर उपस्थित संजय पी.करंदे सर, सुबोध एम.कांतायन , या द्वयबंधूंनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनमोल सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एस ए पवार यांनी तर आभार सौ.एस.व्ही.साळुंखे मॅम यांनी केले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनींचे , शिक्षकेत्तर कर्मचारी बंधूंचेही विशेष सहकार्य लाभले.