गोंडगाव येथील घटनेच्या निषेधार्थ पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था श्री. गो.से.हायस्कूल पाचोरा तर्फे मुक मोर्चाचे आयोजन
पाचोरा (प्रतिनिधी) गोंडगाव ता. भडगाव येथील अल्पवयीन बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पाचोरा तालुका सहकारी संस्था संचलित .श्री.गो.से. हायस्कूल पाचोरा, या शाळेतर्फे आज दि. 7 ऑगस्ट रोजी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाची सुरुवात गो.से.हायस्कूल येथून करण्यात आली. भुयारी मार्ग, शिवाजी चौक, व प्रांत ऑफिस या मार्गाने हा मोर्चा नेण्यात आला.
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पी.एम. वाघ , उपमुख्याध्यापक . एन. आर.ठाकरे,पर्यवेक्षक . आर. एल.पाटील, . ए.बी. अहिरे, सौ. ए.आर. गोहिल,किमान कौशल्य विभाग प्रमुख . मनीष बाविस्कर, तांत्रिक विभाग प्रमुख . एस. एन. पाटील सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.
. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन संजय वाघ, व्हाईस चेअरमन व्हीं टी जोशी,शालेय समिती चेअरमन खलीलदेशमुख,तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन, ज्येष्ठ संचालक सतीश चौधरी . उपस्थितीत पाचोरा विभागाचे प्रांत अधिकारी व पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात वरील घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला असून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा, तसेच या नराधमास कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज चौकात या मूक मोर्चा चा समारोप करण्यात आला.