चोपडा पोलिसांची कारवाई काही तासातच मोटार सायकल चोरी करणाऱ्याला अट्टक
संजय नाना देवरे, रा. वडजाई, ता. जि. धुळे यांची दिनांक- 12/01/2023 रोजी रात्री 08/00 ते 09/00 वा. चे दरम्यान चोपड़ा शहरातील लोहाना पेट्रोलपंपाच्या मागील भागातुन एच. एफ. डिलक्स मोटार सायकल कोतीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याने पोलीस स्टेशन चोपडा शहर येथे अज्ञात आरोपी विरुद्ध मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरील प्रमाणे दाखल गुन्ह्याचे तपासी अंमलदार पोहेकॉ / 1590 शेषराव तोरे यांनी सदर गुन्ह्यात आरोपी 1) पवन संजय साळुंखे, रा. सुंदरगढी चोपडा तसेच 2 ) अमोल राजेंद्र अहिरे, रा. खडगांव ता. चोपड़ा यांना अटक करुन तसेच 3 ) विधी संघर्षीत बालक सागर प्रल्हाद अहिरे, रा.खडगांव ता. चोपडा यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटार सायकल 1) एम. एच. 18. ए. एम. 8666 एच.एफ डिलक्स मोटार सायकल तसेच, या व्यतिरीक्त 2) एम.एच.19 बी बी 5004 हिरो होंडा कंपनीची पॅशन प्रो मोटार सायकल व 3) एम.पी. 10 एन.ए.3444 एच एफ डिलक्स कंपनीची मोटार सायकल, 4) विना क्रमांकाची लाल काळ्या रंगाची एच.एफ डिलक्स मोटार सायकल अशा एकुण अंदाजे 1,20,000/- रुपये किंमतीच्या चार मोटार सायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.
वरील गुन्ह्यात आरोपी क्रं. 1 व 2 यांना अटक करुन त्यांना आज मा.न्यायालयासमोर हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांची दिनांक 31/07/2023 पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केलेली आहे. सदर आरोपीतांनी या व्यतिरीक्त अजुन गुन्हे केलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर आरोपीतांकडुन आणखी इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
मोटार सायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी व यापुर्वी घडलेले गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मा.एम. राजकुमार साहेब पोलीस अधिक्षक जळगांव यांनी वेळोवेळी गुन्हे बैठकी दरम्यान तसेच दैनंदिन आदेश देत असतात त्यांच्या आदेशान्वये व मा. रमेश चोपडे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, चाळीसगाव यांच्या तसेच, मा, कृषीकेश रावले सहा. पोलीस अधिक्षक उपविभाग चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. के. के. पाटील साहेब, स.पो.नि. अजित सावळे, स.पो.नि.संतोष चव्हाण, पो.उप नि. घनशाम तांबे सहा. फौ./ 2533 सुनिल पाटील, पोहेकॉ / 1590 शेषराव तोरे, पोहेकॉ / 3180 विलेश सोनवणे, पोहेकॉ / 1577 दिपक विसावे, पोहेकॉ / 2570 जितेंद्र सोनवणे, पोहेकॉ/2807 शिवाजी धुमाळ, पोहेकॉ / 1805 ज्ञानेश्वर जवागे, पोहेकॉ / 1197 प्रदिप राजपुत, पोना/2086 संतोष पारधी, पोना / 1827 हेमंत कोळी, पोना / 3320 प्रमोद पाटील, पोना / 1787 मधुकर पवार, पोना / 3110 संदिप भोई, पोना / 3112 किरण गाडीलोहार, पोना / 3124 ईश्वर धनगर, पोकों / 3220 मिलींद सपकाळे, पोकों / 1557 प्रकाश मथुरे, पोकों/ 1629 रविंद्र पाटील, पोकों / 1529 प्रमोद पवार, पोकों / 3262 विजय बच्छाव, पोकॉ/3305 सुमेर वाघरे, पोकों / 618 शुभम पाटील, पोकों / 1190 आत्माराम अहिरे यांनी सदरची कामगिरी केलेली आहे.