मा. ज्योतिबा फुले शिक्षण परिषदेकडून मिठाबाई कन्या शाळेला खुर्च्या भेट
पाचोरा- महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण परिषदेच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त जळगाव शाखेतर्फे पाचोरा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालयातील शिक्षक दालनासाठी सहा खुर्च्या भेट देण्यात आल्या.
महाराष्ट्र राज्य महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण परिषदेचा 11 वा वर्धापन दिन राज्यात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने संघटनेच्या जळगाव जिल्हा शाखेतर्फे कार्याध्यक्ष प्रा शिवाजी शिंदे यांचे कडून मिठाबाई कन्या शाळेतील शिक्षक दालन मधील आसन व्यवस्था साठी सहा खुर्च्या भेट म्हणून देण्यात आल्या.
प्रा. शिवाजी शिंदे यांनी महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण परिषदेच्या कार्याची ओळख या निमित्ताने करून दिली. निंभोरी ता. पाचोरा येथील माजी सरपंच व मराठा समाज चळवळीतील अग्रणी नेतृत्व रमेश तात्या पाटील यावेळी उपस्थित होते. विद्यालयाचे प्राचार्य संजय पवार, माणिक राजे ट्रस्टचे विश्वस्त प्रा. रवींद्र चव्हाण, वरिष्ठ लिपिक शिवाजीराव बागुल, अंबालाल पवार सर, नंदू पाटील सर, प्रा. प्रतिभा परदेशी मॅडम, प्रा. अंकिता देशमुख मॅडम, प्रा. संगीता राजपूत मॅडम, संगीता बाविस्कर मॅडम, कल्पना पाटील मॅडम, प्रणाली टोणपे मॅडम, विजय पाटील, हेमराज पाटील, आबाजी पाटील, शिवराम पाटील, धनराज धनगर, आदि कर्मचारी बांधव यावेळी उपस्थित होते.