राष्ट्रवादी अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांचे आज रात्री अल्पशा आजाराने निधन झाले

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांचे आज रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.

हाजी गफ्फार मलिक यांनी तत्कालीन जळगाव नगरपालिका आणि नंतर जळगाव महापालिकेत नगरसेवकपदासह विविध समितींचे अध्यक्षस्थान भूषविले. तत्कालीन आमदार सुरेशदादा जैन यांचे विश्‍वासू सहकारी म्हणून ओळख असलेले मलिक यांनी दादांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली तरी स्वत: पक्ष सोडला नाही. यानंतर त्यांना पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा मुस्लीम चेहरा म्हणून ओळखले जाणारे गफ्फार मलिक यांनी २०१४ साली यावल-रावेर विधानसभा मतदारसंघातून निवडणून लढविली. मात्र ते पराभूत झाले होते. अल्पशा आजाराने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असतांना मलिक यांनी शेवटचा श्‍वास घेतला