पाचोरा ग्रामीण रुग्णालयात “मला जाऊ द्या ना घरी आता वाजले कि बारा” आरोग्य अधिकाऱ्यांकडून होतेय शासनाची फसवणूक;नागरिकांचे आरोग्य गेले खड्यात

पाचोरा ग्रामीण रुग्णालयात “मला जाऊ द्या ना घरी आता वाजले कि बारा” आरोग्य अधिकाऱ्यांकडून होतेय शासनाची फसवणूक;नागरिकांचे आरोग्य गेले खड्यात!

 लावारीस डेडबॉडी पॅकिंगसाठी लागणारे साहित्य पाचोऱ्यातील एका दात्याकडून तर मग लाखोंचा बिल निघाले कश्याची?

गैर मार्गानी सदर अधिकारी पगार घेऊन नागरिकांची सेवा करत नसतील तर यांना निलंबित करावे!

पाचोऱ्यातील त्या डॉक्टरांकडून शासनाच्या योजनांचे तीन तेरा; पगार मात्र घरात.

(भाग-१)
दि.१५ जुलै २०२३ | राज्य व केंद्र सरकार जनतेच्या आरोग्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबवित आहे. शासनाच्या विविध योजना तसेच नागरिकांचे आरोग्य यासाठी देखील शासन करोडो रुपयांचा निधी हा ग्रामीण आणि शहरी भागासाठी देत आहे.

आमदार किशोर पाटील यांच्या मतदार संघातील पाचोरा ग्रामीण रुग्णालयात मात्र नागरिकांना देणात येणाऱ्या आरोग्य सुविधांचे ‘तीन तेरा’ झालेले असल्याचे चित्र आहे. याठिकाणी जवळपास ५० कर्मचारी व अधिकाऱ्यांची यादी आहे. यामध्ये फक्त बोटावर मोजण्याइतकेच अधिकरी व कर्मचारी याठिकाणी दिसून येतात. अजून याबाबत माहिती घेतली असता याठिकाणी एक्सरे मशीन, दांत तपासणी विभाग,रक्त तपासणी विभाग,डिलिव्हरी सिजर कक्ष, ऑक्सिजन प्लांट,लहान बालकांचा विभाग,नेत्र तपासणी हे सगळे कागदोपत्री सुरु असून वास्तव मध्ये हे सगळं बंद अवस्थेत आहेत. या सगळ्या विभागातील सेवा ह्या जवळपास बंदच असतात यांचा पगार मात्र ते नक्कीच घेतात हि शासनाची फसवणूक नाही का?

प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण रुग्ण समितीच्या माध्यमातून लाखोंचा निधी नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी येतो प्राथमिक स्वरूपात लागणारे ट्राली,स्ट्रेचर,व्हील चेअर्स अश्या छोट्या छोट्या गोष्टी देखील या रुग्णालयात नाहीत यावर संबधीत सतीश ताक नामक अधिकारी त्याच्या जोडीला वैदयकिय अधिकारी अमित साळूंखे देखील कार्यरत असून सदर अधिकारी लक्ष देतात का असा प्रश्न उपस्थित होतो? संबधीत कामचुकार अधिकारी यांच्यावर काहीच कारवाई होत नसून या मुजोर अधिकारी कर्मचारी यांच्यावर वरदहस्त वरिष्ठ अधिकाऱ्यांचे असल्याचे समजून येते.

शासनांकडून नागरिकांच्या आरोग्यासाठी खर्च करण्यासाठी आलेल्या निधीचा वापर सदर अधिकारी कर्मचारी जर स्वतःचा फायद्यासाठी करत असतील तर अश्या अधिकाऱ्यांचे निलंबन करून यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करण्यात यावी या विषया कडे वरिष्ठ अधिकारी व आमदार किशोर पाटील लक्ष देतील का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

(पाचोरा ग्रामीण रुग्णालयात होणाऱ्या पी एम मध्ये कसा होतो काळा बाजार? अजून बरेच काही पुढील बातमीत नक्की वाचा)