कार्यकर्त्यानी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या दृष्टीने कामाला लागा आ. किशोर पाटील

कार्यकर्त्यानी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या दृष्टीने कामाला लागा आ. किशोर पाटील

 

 

भडगाव ता.15: कार्यकर्त्यानी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या दृष्टीने कामाला लागा !
आपली बूथरचना भक्कम करा असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी केले. ते भडगावात आयोजीत शिवदूत, बुथप्रमुख,शाखा प्रमुख व विभाग
प्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
—————
भडगाव येथे शिवसेना शिवदूत, बुथप्रमुख,शाखा प्रमुख विभाग
प्रमुखांचा बाजार समीतीच्या आवारात मेळावा आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा परीषदेचे माजी सभापती विकास पाटील, उपजिल्हाप्रमुख डाॅ.विशाल पाटील, तालुकाप्रमुख संजय पाटील, युवराज पाटील,कृउबा चे सभापती गणेश पाटील,उपसभापती पी.ए.पाटील, माजी नगराध्यक्ष शशिकांत येवले, वैद्यकीय आघाडीचे डाॅ.प्रमोद पाटील, शहरप्रमुख अजय चौधरी, योगेश गंजे, शेतकी संघाचे उपाध्यक्ष भय्यासाहेब पाटील, वाड्याचे देविदास महाजन, परशुराम माळी, युवासेनेचे तालुकाप्रमुख पुरुषोत्तम महाजन, डाॅ.विलास पाटील, जगन भोई, पथराडचे रावसाहेब पाटील उपस्थित होते.
आमदार किशोर पाटील म्हणाले की, वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आम्ही गेलो. तुम्हीही माझा हा निर्णय मान्य करत बाजार समिती व शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवून दिले. मतदार संघातील जनतेचे कामे मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषद गटनिहाय जनसेवा कार्यालय उघडविण्यात आले. त्या माध्यमातून जनतेपर्यंत शासानाच्या योजना पोहचविण्याचे काम सुरू आहे. ते पुढे म्हणाले की, आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागणे आवश्यक आहे. आपली बुथ रचना प्रत्येकांने भक्कम करणे गरजेचे आहे. या वर्षभरात मतदार संघात कोट्यावधी कामे केली आहेत. कार्यकर्त्यानी ती जनतेपर्यंत पोहचवायला हवीत. सध्याचे सरकार ज्या वेगाने विकास कामे करते आहेत. तो पाहीला तर महायुतीचे 200 आमदार सहज निवडुन येतील अशी परीस्थीती आहे. यावेळी जिल्हाप्रमुख रावसाहेब ,उपजिल्हाप्रमुख डाॅ.विशाल पाटील , जिल्हा परीषदेचे माजी सभापती विकास पाटील यांनी मेळाव्यात मार्गदर्शन केले.