डॉ. भाऊसाहेब मिस्तरी यांची रंधा कादंबरी आता अभ्यासक्रमात

डॉ. भाऊसाहेब मिस्तरी यांची रंधा कादंबरी आता अभ्यासक्रमात

रंधा ही भाऊसाहेब मिस्तरी लिखित कादंबरी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद मॉडेल कॉलेज घनसांगवी जि. जालना बी.ए ऑनर्स मराठी द्वितीय वर्ष सत्र चौथे सीबीसीएस पद्धतीनुसार जून 2023 पासून लागू करण्यात आली आहे.
भाऊसाहेब मिस्तरी यांची रंधा ही कादंबरी बहुचर्चित आहे. या कादंबरीवर अनेक मान्यवरांनी अनेक वृत्तपत्रातून नियतकालिकातून लेखन केलेले आहे. यासोबतच खानदेशी रेडिओवर रंधा कादंबरीवर मान्यवरांनी लिहिलेल्या समीक्षांचे सलग 19 भागात प्रसारण करण्यात आले आहे. मराठवाडा साहित्य परिषदेने रंधा निर्मिती प्रक्रियेवर भाऊसाहेब
मिस्तरी यांचे यापूर्वी व्याख्यान आयोजित केले होते. बारा बलुतेदारी यातला महत्त्वाचा घटक सुतार लोहार हा समाज आहे. या समाजावर चित्रित आणि तात्कालीन समाज, समाज व्यवस्था, निसर्ग, ग्रामीण वास्तव, शिक्षणाचे महत्त्व, मानवता या साऱ्या गोष्टी
डॉ. भाऊसाहेब मिस्तरी यांच्या वैशिष्ट्यपूर्ण लेखन शैलीत सशक्तपणे रंधा या कादंबरीत आलेल्या आहेत. रंधा ही कादंबरी म्हणून कुठल्याही समाजात बांधली जात नाही ती निसर्गावर बोलते, मानवतेवर बोलते, शिक्षणावर बोलते एकूणच समाज कल्याणसाठी, नव्या पिढीसाठी रंधा ही कादंबरी अत्यंत महत्त्वाची महत्वपूर्ण ठरत आहे.
प्रा. डॉ. सर्जेराव जिगे अध्यक्ष मराठी अभ्यास मंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांचे रंधा कादंबरी निवडी विषयकपत्रक भाऊसाहेब मिस्तरी यांना प्राप्त झाले आहे. साहित्य आणि सांस्कृतिक विभागातील अनेक मान्यवरांनी डॉ.भाऊसाहेब मिस्तरी यांचे अभिनंदन केले आहे आणि पुढील साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.