रुग्णांच्या जीवनवृध्दीचे विश्वासपात्र दालन असलेल्या सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पाचोरा येथे राज्य शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना ( MJPJAY) व केंद्र सरकारची प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ( PMJAY) सुरु
पाचोरा येथे गेल्या चार वर्षापूर्वी डॉ. स्वप्नील पाटील व डॉ.ग्रिष्मा पाटील या उच्चविद्याविभूषित दांम्पत्याने ‘सेवा’ आणि ‘समर्पण’ या तत्त्वांचा घेतलेला वसा पूर्णत्वास नेण्यासाठी सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे रोपटे लावून रुग्णसेवा सुरू केली. अचूक निदान, प्रामाणिक रूग्णसेवा, मानवता व समाजाप्रती असलेली बांधिलकी या तत्त्वांच्या आधारे रुग्णसेवा केल्याने या रोपट्याचे अवघ्या चार वर्षात वटवृक्षात रूपांतर झाले असून पाचोऱ्यासह परिसरातील हजारो रुग्णांनी या वटवृक्षाखाली जीवनवृद्धीचा आनंद मिळवला व अनेक रूग्ण तो आनंद मिळवत आहेत. त्यामुळेच या हॉस्पिटलने रुग्णांच्या हृदयात अढळस्थान निर्माण केले आहे.
सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये आता राज्य शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना ( MJPJAY) व केंद्र सरकारची प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ( PMJAY) सुरु झाली आहे.
या योजने अंतर्गत पिवळया व केशरी रेशन कार्ड धारकांना मोफत उपचार भेटणार आहे.
सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये ICU (अतिदक्षता विभाग), NICU ( नवजात शिशु अतिदक्षता विभाग ), ऑपेरेशन थेटर, सी टी स्कॅन सेंटर ( CT Scan ), 2 D इको, अश्या वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध आहे.
सर्व अत्याधुनिक सोयी सुविधा, रुग्ण व त्यांच्या नातलगांप्रती आदरभाव, सुसज्ज रुग्णवाहिका व आयसीयू युनिट, सेवाभावी सेवक वर्ग व माफक दरात औषधी, गोरगरिबांसाठी सवलतीच्या व मोफत उपचाराच्या योजना, आरोग्य विषयक जनजागृती साठी सामाजीक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून शहरी व ग्रामीण भागात आरोग्य शिबिरांचे आयोजन अशा विविधांगी गुणवैशिष्ट्यांमुळे सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल खऱ्या अर्थाने आरोग्य व जीवनवृद्धी साठी सार्थकी ठरले व ठरत आहे .
राज्य शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना ( MJPJAY) व केंद्र सरकारची प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ( PMJAY) यांचा लोकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन डॉ स्वप्निल दादा पाटील व डॉ ग्रिष्मा पाटील यांनी केलेले आहे.