पाचोरा शहरातील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त,,,,आणि नगरपालिका पाणीपुरवठा अधिकारी व कर्मचारी मस्त यावर बंदोबस्त करण्यासाठी धावेल का? कुणी पुढे,,,,
पाचोरा प्रतिनिधी पाचोरा शहरातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ,,, नगरपालिकेचे दुर्लक्ष बोलायला कुणीच नाही
पाचोरा शहरातील जनतेवर ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे,, नगरपालिके कडुन भोंगे लावुन सांगितले जाते की पिण्याचे पाणी हे चार दिवस ऐवजी पाच दिवसांनी येणार आहे परंतु कुठे-कुठे तर दहा ते बारा दिवस होऊन ही पाणी नाही, मानलं की पाऊस यावर्षी उशिरापर्यंत सुरू झाला नाही परंतु नगरपालिका पाणी कर्मचारी चे नियोजन नाही,गिरणा नदीस आवर्तन सोडले की पाण्याचा व्यवस्थीत साठा होत नाही,,पाण्याची नासाडी होते की चोरी होते कि नदी पात्रात पाणी जिरते समजेना से होत आहे पाचोरा शहरातुन नागरिकांकडुन आधी जेव्हा आदरणीय दिलीपभाऊ नगरपालिकेत नगराध्यक्ष होते त्या काळात गिरणा धरण ६%. ते ७% असतांनाही ही तीन दिवसांत पाणी हे पाचोरा शहरातील नळांना यायचं भाऊंसारखे पिण्याच्या पाण्याचे नियोजन कुणीही करु शकत नाही हे शंभर टक्के खरं आहे म्हणजेच दगडावरची रेघ च म्हणायला हरकत नाही मानलं की रस्ते ,लाईट व्यवस्था उत्तम रित्या सुंदर स्वच्छ शहर आहे परंतु ओपन प्लेस जागेची पण सुंदरता ही रेल्वेभुयारी पलिकडच्या बाजूलाच जास्त प्रमाणात आढळते,कृष्णापुरी ते वरखेडी नाका पर्यंत हे कामे कमी प्रमाणात दिसुन येतो असं का येथील प्रतिनिधी वैगरे कुणीही बोलायच्या तयारीत नसतो का? तरी जेव्हा गिरणा नदीस आवर्तन सोडले जाते तेव्हा नळाचे व्हाल कर्मचारी वेळेत बंद करत नसल्याने खुपचं पाणी वाया जातांना प्रत्येक कोणत्या ना कोणत्या प्रभागात नजरेत पडत असते यावर कुणी बंदी आणेल का? पाण्याचे नियोजन कटीबद्ध होईल का? नगरपालिका ही व्यवस्था करेल का? शहरातील जेष्ठ नागरिक पत्रकार मंडळी हा आधारस्तंभ आहे त्यांनी आवाज उठवला पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे ,तरी यापुढे गिरणेचे आवर्तन सोडल्या नंतर नगरपालिकेच्या आदरणीय पाणी सोडणा-या कर्मचारी महोदयांना विनंती आहे की पाणी जर दोन तास सोडत असाल तर १ तास सोडावा परंतु फुल प्रेशर ने सोडुन वेळेत व्हाल बंद करावा जेणेकरून पाणी वाया जाणार नाही