श्री. सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिराच्या बाल वारकऱ्यांची “आनंदवारी” व “रिंगण सोहळा” मोठ्या उत्साहात संपन्न

श्री. सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिराच्या बाल वारकऱ्यांची “आनंदवारी” व “रिंगण सोहळा” मोठ्या उत्साहात संपन्न

श्री.सु.भा.शाळेची दिंडीच भारी… आषाढी एकादशी निमित्त पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिराच्या बाल वारकऱ्यांची “आनंदवारी” व “रिंगण सोहळा” मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या, वारकऱ्यांच्या वेशभूषा साकारून प्रभात फेरी व रिंगण सोहळा टाळ मृदुंगाच्या गजरात, फुगड्या खेळत,विठू नामाच्या जयघोषात पार पाडला. प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.अशोक परदेशी सर,सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.