क्रिएटिव्ह स्कूलची आषाढीनिमित्त दिंडी पालखी सोहळा उत्साहात संपन्न
नांद्रा ता. पाचोरा (प्रतिनिधी) सालाबादप्रमाणे यावर्षी आणि आषाढी एकादशीनिमित्त स्कूलच्या विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी विविध प्रकारचे वारकरी टाळकरी व विठ्ठल रुक्माई चे वेशभूषा परिधान करून गळ्यात टाळ, डोक्यात टोपी,धोती कुर्ता, पायजमा असा सुंदर पेहेराव करून पायी दिंडी सोहळ्यात वृक्ष,ग्रंथ याबरोबर विठ्ठल रुक्माई यांच्या मूर्तीचे पूजन करून गावातून भव्य संवाद्य मिरवणूक काढून कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी सर्व गाव विठ्ठल रुख्मिणी यांच्या जयघोषात दुमदुमून गेले याप्रसंगी पालखी पूजन भजनी मंडळाचे ज्येष्ठ कलावंत ह भ प एकनाथ बाविस्कर महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले सोबत सरपंच अमोल सूर्यवंशी उपसरपंच शिवाजी तावडे ग्रामपंचायत सदस्य आनंद बाविस्कर, गुलाबसर बाविस्कर, अमोल तावडे सर ,बालू तावडे,शिवाजी महारु सूर्यवंशी दिगंबर सूर्यवंशी,नाना सातपुते,आप्पा सूर्यवंशी, शरद बाविस्कर, सखाराम तुकाराम पाटील दिलीप आबा सूर्यवंशी, रमेश आबा सूर्यवंशी,तुकाराम मिस्त्री व गावातील महिला भजनी मंडळ प्रतिनिधी वैजंताताई शामराव सूर्यवंशी,दुर्गाबाई फुलचंद पवार, सह गावातील माता-भगिनी यांच्या शुभहस्ते पूजन करून उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी प्रा. यशवंत पवार शिक्षिका वृंद,नम्रता पवार वैशाली पाटील, अरुंधती राजेंद्र, अनुराधा पाटील, शितल पाटील, प्रतीक्षा वाणी, छाया पटाईत,आरती सोनवणे, हर्षदा सोनार,पूजा सूर्यवंशी तसेच नामदेव पाटील नवल पाटील भगवान गोपाळ यांनी कार्यक्रम यशस्वीते साठी परिश्रम घेतले