समाज कल्याण आयुक्त व विद्यापीठाचे कुलगुरू यांच्यांत विद्यार्थीच्या प्रश्नांबाबत भेट व चर्चा

समाज कल्याण आयुक्त व विद्यापीठाचे कुलगुरू यांच्यांत विद्यार्थीच्या प्रश्नांबाबत भेट व चर्चा


जळगाव (दि.१३/०६/२०२३) समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे हे आज रोजी जळगाव येथे विविध कार्यक्रमांसाठी आले असता विद्यापीठात कुलगुरू प्रा व्ही. एल. माहेश्र्वरी यांच्यात भेट होऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा केली आहे.
शिष्यवृत्ती सह शासनाच्या विविध योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना वेळेत होण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतर्गत सर्व महाविद्यालयांमध्ये समान संधी केंद्र सुरू करण्याची विनंती समाज कल्याण आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे यांनी यावेळी केली. तर विद्यापीठाच्या वतीने शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून या पुढील काळात देखील सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी प्र-कुलगुरू एस.टी.इंगळे, कुलसचिव विनोद पाटील, वित्त व लेखा अधिकारी श्री रविंद्र पाटील, प्रादेशिक उपायुक्त श्री माधव वाघ, बहुजन कल्याण विभागाचे प्रादेशिक उपसंचालक, डॉ. भगवान वीर, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण जळगाव श्री वाय एस पाटील, समान संधी केंद्राचे समन्वय प्रा.डॉ रामटेके यांच्यासह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद अदि मान्यवर उपस्थित होते.
———————————–