खेडगाव नंदीचे येथे युवासेना तर्फे शिव सवांद अभियान संपन्न
आज दिनांक 23 मे रोजी शिवसेना पक्षाच्या पाचोरा भडगाव मतदारसंघाचा नेत्या सौ वैशाली ताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते गाव तेथे शाखा व गाव तिथे युवा सैनिक या अभियाना अंतर्गत आज खेडगाव नंदीचे येथे युवासेना तर्फे शिव सवांद अभियान आयोजित करण्यात आले होते स्वर्गीय तात्यासाहेब आर ओ पाटील यांची कन्या व या तालुक्याची लेक सौ वैशाली ताई सूर्यवंशी यांच्या माध्यमातून गेल्या सात महिन्यापासून सामाजिक कार्य जे सुरू असून त्या कार्याची माहिती घराघरापर्यंत पोहोचण्याचा उद्दिष्ट युवा सेनेने सुरू केले असून ताईंनी पाचोरा भडगाव मतदार संघ मोतीबिंदू मुक्त व्हावा यासाठी तब्बल 700 ऑपरेशन मोफत करून या गोष्टीवर न थांबता दर महिन्याच्या दोन तारखेला पाचोरा येथे दर महिन्याच्या चार तारखेला भडगाव येथे शिवसेना कार्यालयात हे शिबिर अखंडपणे सुरू आहे तरी जनतेने याचा लाभ घ्यावा अशाप्रकारे ताईंनी एक माणुसकीचा संदेश या मतदारसंघात दिला आहे ताईकडे कोणती पद नाही सत्ता नाही तरीपण आपल्या वडिलांनी केलेल्या गोरगरिबांची सेवा ही अखंडपणे सुरू राहावी म्हणून हा वारसा ताईंनी अखंडपणे सुरू केला आहे व भविष्यात पाचोरा भडगाव मतदार संघ हा बेरोजगारी मुक्त व्हावा असेही प्रयत्न ताई करणार आहे माझा युवक हा व्यसनाकडे न वळता त्याने त्याच्या स्वतःच्या पायावर उभे राहून आपल्या परिवाराची सेवा करावी म्हणून जे तरुण पोलीस भरतीसाठी सैन्य भरतीसाठी प्रयत्न करत असतील त्यांच्यासाठी पाचोरा शहरात नवीन निर्मल इंटरनॅशनल स्कूल पुनगाव रोड येथे अभ्यास पुस्तकाची लॅब सुरू केलेली आहे पाचोरा भडगाव मतदार संघातील तरुणांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशा अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम ताई राबवत असून एक चांगलं नेतृत्व एक सुसंस्कृत नेतृत्व या मतदारसंघाला लाभणार आहे म्हणून सर्वांनी एकनिष्ठतेने ताईंच्या पाठीशी उभे राहून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व कोणत्याही इलेक्शन असो आपण ताईंना साथ देऊन ताईंचे हात बळकट करा नक्कीच आपल्याला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही मी उपजिल्हाप्रमुख या नात्याने आपणासमोर देत आहोत सर्व युवा सैनिक व ग्रामस्थांनी वैशाली सूर्यवंशी यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा संकल्प केला व ताईंनी केलेल्या कामाचं कौतुक केले खरंच तात्या साहेबांच्या रूपात आज ताई खऱ्या अर्थाने त्यांचा राजकीय वारसा त्यांचा सामाजिक वारसा पुढे नेत आहे या गोष्टीचा कौतुक ग्रामस्थांनी केले व आभार किरण भाऊ यांनी मानले