पोलीस दलात भरती झालेल्या तरुणांनी नोकरी करतांना प्रमाणिकतेसह सेवाभाव जपावा आ.किशोर अप्पा पाटील यांचे प्रतिपादन
पाचोरा(वार्ताहर) दि,२२
पोलीस दलाच्या सेवेत नव्याने भरती झालेल्या तरुणांनी नोकरी करत असतांनाच प्रमाणिकतेसह सेवाभाव जपत स्वतःच्या उन्नतीसह राज्याच्या विकासात देखील आपले योगदान देऊन तालुक्याचा लौकिकात भर घालावी असे प्रतिपादन आ.किशोर अप्पा पाटील यांनी केले.नुकतेच पोलीस दलात भरती झालेल्या तरुणांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
‘शिवालय’ या आ.किशोर अप्पा पाटील यांच्या संपर्क कार्यालयात रविवारी संध्याकाळी ६ वाजता संपन्न झाला.यावेळी नव्याने भरती झालेले सुमारे साठ हुन अधिक तरुण यावेळी उपास्थीत होते.या सर्व तरुणांना पुष्पहार घालून पेढे भरवत आ.किशोर अप्पा पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, भाजपा जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे, शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख इंदलसिंग परदेशी,बाजार समिती संचालक मनोज सिसोदिया, पीपल्स बँकेचे व्हाईस चेअरमन प्रशांत अग्रवाल,युवा नेता सुमीत पाटील, प्रवीण ब्राह्मणे, यांची मंचावर उपस्थिती होती.यावेळी रावसाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त करत नवीन भरती झालेल्या तरुणांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी पुढे बोलतांना आ. किशोर अप्पा पाटील म्हणाले की,महाराष्ट्र शासनाने भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवल्या बद्दल त्यांनी राज्य शासनाचे आभार व्यक्त केले या भरती मुळे खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील वर्षानुवर्षे मेहनत घेणाऱ्या युवकांना व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला असून या तरुणांनी पुढे खात्या अंतर्गत परीक्षा देऊन अधिकारी पदापर्यंत पोहचत उज्वल यश संपादन करावे अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.ऊयावेळी माजी सैनिक असलेल्या सुमारे वीस जवानांना देखील या भरती प्रक्रियेत संधी मिळाल्याने त्यांचा देखील विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रवीण ब्राह्मणे यांनी केले तर आभार इंदलसिंग परदेशी यांनी मानले.