पाचोरा तालुक्यात लाच घेणाऱ्याला अट्टक अँटी करप्शन जळगावची कारवाई
पाचोरा तलुक्यातील सातबारा उताऱ्यावर बोजा बसवण्याचे शासकीय काम तलाठ्याकडून करून देण्यासाठी १ हजार ३६० रुपयांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या खाजगी पंटराला जळगाव एसीबीच्या पथकाने दि १७ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास अटक केली. पाचोरा तालुक्यातील बांबरूड येथील भगवान कुंभार (वय ४४) असे अटकेतील संशयिताचे नाव असून ही कारवाई बांबरूड येथे संशयिताच्या घरी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, लासगाव येथील तक्रारदार यांच्या आईच्या नावावर शेती असून त्यांनी एक लाख 30 हजारांचे पीक कर्ज घेतले आहे. शेतीच्या सातबारा उताऱ्यावर कर्जाचा बोजा लावण्यासाठीचे काम पाचोरा येथील कार्यालयातून करून देतो म्हणून भगवान दशरथ कुंभार (44, बांबरूड, ता. पाचोरा) यांनी तक्रारदाराकडे एक हजार 360 रुपयांची लाच मागितली मात्र तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे मंगळवारी तक्रार नोंदवताच सापळा रचण्यात दुपारी 12.30 वाजेच्या बांबरुड येथील आरोपीच्या घरा जवळ सापळा यशस्वी करण्यात आला, शशिकांत पाटील, पोलिस मराठे, पो.कॉ. अमोल पोलिस उप अधीक्षक निरीक्षक श्रीमती. एन. एन. जाधव, पो.ना. ईश्वर धनगर, पो.कॉ. राकेश दुसाने. PI.श्री. संजोग बच्छाव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ. सुरेश पाटील, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ. रविंद्र घुगे, पो.ना. जनार्दन चौधरी, पो.ना. किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना. बाळु सुर्यवंशी, पो.कॉ. प्रणेश ठाकूर, यांनी केली कारवाई.