भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त पाचोऱ्यात भव्य शोभायात्रा व संगीत रजनी चा कार्यक्रम उत्साहात
पाचोरा –भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे पाचोऱ्यात मोठ्या उत्साहात भक्तीभावाने साजरा करण्यात आला.भगवान परशुरामाच्या प्रतिमेचे पूजन करून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे शहरात भव्य शोभायात्रा व मोटरसायकल रॅली काढण्यात आली येथील देशमुख वाडी भागातील हनुमान मंदिरा पासून पुनगाव रोडवरील गजानन महाराज मंदिर पर्यंत भव्य शोभायात्रा व मोटरसायकल रॅली काढण्यात आली यावेळी समाज बांधवांनी भगव्या टोप्या व भगवे ध्वज मोटरसायकलवर लावून शिस्तबद्ध शोभायात्रा सायंकाळी ६ वाजता काढण्यात आली. शोभायात्रेत भगवान परशुराम यांचा देखावा राम शर्मा यांनी सादर केला होता. ब्राह्मण महासंघाचे स्त्री-पुरुष अबालवृद्ध, पुरोहित संघ ब्रह्मवृंद हे रॅलीमध्ये मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.शिंदाड, पिंपळगाव हरे,पिंप्री बु,नगरदेवळा,वरखेडी,आदी गावातील ब्रह्मवृंद सहभागी झाले होते. रात्री आठ वाजता गजानन महाराज मंदिरा च्या भव्य प्रांगणात संगीत रजनीचा कार्यक्रम नादब्रह्म संगीत विद्यालयाचे गोविंदराव मोकाशी व मीनाक्षी शर्मा यांच्या संगीत विद्यालयाचे पथकातील प्रशांत पाटील,सुनील पाटील,तबला वादक पांडुरंग पाटील, देवांगी मोकाशी,चिन्मय कुलकर्णी,अमेय भट,सिद्धी कुलकर्णी, धनश्री कुलकर्णी,खुशी दायमा, संगीत रजनीचा कार्यक्रम सादर केला.कु अनन्या पाटील या चिमुकलीने परशुरामाची कहाणी सांगितली, महेश कौंडिण्य यांनी सुत्रसंचलन केले. यावेळी भक्ती गीते भावगीते सादर करून उपस्थितांनी भरभरून दाद दिली. यावेळी पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मुंकुद बिल्दीकर ,गिरीष कुळकर्णी,संजय कुळकर्णी ,सुजित तिवारी ,सागर तांबोळी ,सुनिल गौड ,श्याम शर्मा ,किशोर पुराणिक , राम शर्मा,विनोद कुळकर्णी, अरुण ओझा ,आनंद शर्मा, मुन्ना गौड,दिनेश पाटील,मनोज शर्मा, गणेश पांडे ,महाविर गौड ,प्रशांत कुळकर्णी, सचिन देशपांडे ,रजवाल मिश्रा ,महेश कौंडिण्य, गिरीश खंडेलवाल,राजू खंडेलवाल,भरत खंडेलवाल, गोवर्धन खंडेलवाल, पुरुषोत्तम खंडेलवाल,कृष्णा व्यास,निर्मल व्यास,भरत तिवारी,दिपक तिवारी,संजय प्र कुळकर्णी यांचेसह समाज बांधव उपस्थित होते.अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष मुकुंद बिल्डीकर व त्यांचे कार्यकारणीतील सदस्य तसेच अखिल भारतीय ब्राह्मण महिला मंडळाचे अध्यक्ष हेमा पाटील व ब्राह्मण महिला मंडळाच्या सदस्या यांच्या अथक परिश्रमाने भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा झाला.