पाचोरा येथील सावा मैदानावर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेसाठी जय्यत तयारीची पाहणी करताना प्रशासकीय अधिकारी
( पाचोरा प्रतिनिधी )पाचोरा येथे आज रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा होणार असून या सभेसाठी पाचोरा शहरातील व तालुक्यातील लाखोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार असून याकरिता भव्य दिव्य असे स्टेज उभारले असून साधारण स्टेजवर साधारणता शंभर लोक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे तसेच तीस ते पस्तीस हजार बसण्यासाठी खुर्च्याची व्यवस्था केली आहे तसेच मान्यवरांकरता स्वतंत्र्य व्यवस्था केली असून पत्रकार मंडळी महिला वर्ग यांच्यासाठी सुद्धा स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे ही सभा भूतो ना भविष्य अशी होणार असून या सभेचे पडसाद पुढील सर्व निवडणुकीत पडतील ही सभा होणार आहे या सभेसाठी पोलीस प्रशासनातर्फे योग्य ते नियोजन केलेले असून शिस्त पद्धतीने सभा होईल यासाठी पोलीस प्रशासना तर्फे ग्राउंड वरील सर्व बारीक सारिक गोष्टीवर लक्ष केंद्रित केलेले असून खबरदारी म्हणून पोलीस यंत्रणा सज्ज आहे. या सभेचे नियोजन पाचोरा तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सौ वैशालीताई सूर्यवंशी, श्री संजयजी सावंत, जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख श्री सुनील पाटील, श्री नरेंद्रसिंग सूर्यवंशी, पाचोरा तालुका शिवसेना संपर्कप्रमुख तसेच जिल्हाप्रमुख श्री दीपक राजपूत, श्री हर्षल माने, तालुकाप्रमुख श्री शरद पाटील, श्री रमेश जी बाफना, श्री अरुण पाटील, श्री उद्धव मराठे, श्री पप्पू राजपूत, श्री भरत खंडेलवाल, श्री अँड. दीपक पाटील, श्री अनिल सावंत, श्री दत्तात्रय जडे, श्री दादाभाऊ चौधरी, श्री संदीप जैन, श्री जितेंद्र जैन, श्री अभिषेक खंडेलवाल, श्री भूपेश सोमवंशी, श्री पप्पू जाधव, श्री हरीश देवरे, श्री प्रशांत सोनार, श्री संजय चौधरी तसेच शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते स्टेजची पाहणी करताना उपस्थित होते.