25 फेब्रुवारी पासून केंद्राची मंजुरी मिळून देखील पाचोर्यात “छत्रपती संभाजीनगर” चे नाव औरंगाबादच…!!!
पाचोरा 25 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्र सरकारला राज्य सरकारने मांडलेल्या प्रस्तावा ला मंजुरी दिली. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजी नगर म्हणून करण्यात यावे अशी विनंती केली होती. त्यानुसार केंद्र सरकारने 25 फेब्रुवारी 2023 रोजी औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजी नगर असे करण्यास मंजुरी दिली.
महाराष्ट्रात सर्वत्र औरंगाबाद हे नाव बदलून छत्रपती संभाजी नगर असे नाव देण्यात येत आहे. मात्र पाचोरा शहरातील एम एच 19 महामार्गावरील रस्ता फलकावरती अद्यापही नामांतर झालेले नाही. अजूनही छत्रपती संभाजी नगर चे नाव औरंगाबाद असे फलकावरती लिहिलेले आहे. सरकारने दिलेले नियम प्रशासनाने पाळावे असे आदेश असताना देखील पाचोरा शहरातील प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. सर्व शहराचे त्या फलकाकडे लक्ष लागून असून कधी हे नाव बदलते याची वेळ सर्व शहरातील तरुण व ग्रामस्थ बघत आहे.
रस्त्यालगतच्या सर्व फलकांवरती औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजी नगर असे करावे अशी मागणी तरुण व भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष समाधान मुळे यांनी केली आहे. जर त्वरित या फलकाचे नामांतर झाले नाही तर रस्त्यावर उतरू असा इशारा समाधान मुळे यांनी दिला आहे.