नांद्रा येथे विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन
नांद्रा(ता.पाचोरा)ता.१५ जि.प.मराठी शाळेत आज सौ.वैशालीताई सुर्यवंशी यांच्या तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबीराचे उद्घाटन सौ.वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख शरद पाटील, रमेश जी बाफना, जिल्हा संघटक विनोद बाविस्कर, कैलास पाटील(आसनखेडा), विनोद पाटील(माहेजी), सुभाष बाविस्कर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष,प्रविण पाटील(सामनेर), सरपंच विनोद तावडे, पोलिस पाटील किरण तावडे, राजेंद्र पाटील (सामनेर), प्रकाश पाटील,बालू पाटील ,प्रा.यशवंत पवार, पत्रकार राजेंद्र पाटील उपस्थित होते . रुग्णांची मोतीबिंदू तपासणी कांताई नेत्रालयाचे डॉ.वैभव शिंदे, डॉ.विनोद पाटील यांनी केली. रमेश बाफना यांनी मानवी जीवन व डोळे यांचे महत्त्व आपल्या मनोगतात व्यक्त केले.बांबरुड कुरंगी गटातील असंख्य महिला व पुरुष यांनी शिबीरात 310मोतीबिंदू तपासून ,60रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी कांताई नेत्रालय जळगाव येथे पाठविण्यात आले . प्रास्ताविक जिल्हा संघटक विनोद बाविस्कर यांनी केले.
कै.तात्यासाहेब आर.ओ.पाटील यांनी शिकवलेल्या गोरगरीब व गरजू लोकांची जनसेवा हीच संकल्पना डोळ्यासमोर ठेवून मी तालुक्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केले.ऑपरेशन ला सर्वंच घाबरतात.घरातील म्हातारी माणसा साठी उद्योग धंद्यातुन दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी वेळ काढण्यासाठी टाळाटाळ केली जाते.डोळ्यांचे महत्व समजुन तालुक्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केले.
सौ.वैशाली सुर्यवंशी.संचालीका निर्मल सिड्स पाचोरा