गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल , पाचोरा येथे विज्ञान व हस्तकला प्रदर्शन उत्साहात
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून शाळेत विज्ञान प्रदर्शन व सोबत हस्तकला प्रदर्शन भरविण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन गटशिक्षण अधिकारी माननीय गिरीश जगताप साहेबयांच्या हस्ते रिबन कापून करण्यात आले तसेच पारंपारिक पद्धतीने दीप प्रज्वलन माननीय गिरीश जगताप सर ,शिक्षण विभागाचे श्री योगेश आहिरराव सर, श्री शिरसाळे सर ,शाळेचे प्राचार्य श्री प्रेम कुमार शामनानी सर यांच्या हस्ते करण्यात आले.
इयत्ता 2 री ते 5 वीच्या विद्यार्थ्यांनी विविध सुंदर असे टाकाऊ पासून टिकाऊ सुबक वस्तू तयार करून त्याबद्दल माहिती भेट देणाऱ्या पालकांना व इतरांना सांगितली. तसेच इयत्ता ६वी ते ९वी विद्यार्थ्यांनी होलोग्राफ ,कार्बन सिस्टीम पाणी शुद्धीकरण तसेच वेगवेगळ्या रासायनिक मिश्रणाच्या संयोगाने निर्माण होणारे जादूमय घटक जसे एलिफंट टूथपेस्ट ,ज्वालामुखी उद्रेक एटीएम, दोन विजेच्या तारा एकमेकांना स्पर्श झाल्यानंतरही शॉर्ट सर्किट होत नाही यासारखे अनेक वर्किंग प्रोजेक्ट कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. विविध मॉडेल सोबतच मुलांनी वेगवेगळे चार्ट बनवून त्याबद्दल माहिती सांगितली. विज्ञान व हस्तकला वस्तूंचे एकूण २७८ प्रोजेक्ट्स चे सादरीकरण करण्यात आले. प्रदर्शनी पाहण्यासाठी व मुलांना प्रोत्सान देण्यासाठी पालकांनीं उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अमेना मोहरा आणि सौ मनीषा पाटील यांनी केले.आभारप्रदर्शन माननीय प्राचार्य श्री प्रेम शामनानी यांनी केले.