जळगावात 11 मार्च रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन
जळगाव, दि. 2 जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव यांच्यातर्फे अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथे पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा ११ मार्च, २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजेपासून आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यासाठी खाजगी आस्थापनांनी एकूण २०५९ रिक्तपदांची मागणी कळविलेली असून रिक्तपदांसाठी शैक्षणिक पात्रता १० वी, १२ वी पास, आयटीआय, डिप्लोमाधारक, पदवीधर आणि इतर शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन वि. जा. मुकणे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
मेळाव्यास येतांना शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, बायोडाटा, पासपोर्ट फोटो इत्यादीसह उपस्थित रहावे. विभागाचे संकेतस्थळ www.mahaswayam.gov.in यावर नोंदणी केलेल्या उमेदवारांनी रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा. तसेच नांव नोंदणी न केलेल्या उमेदवारांनी संकेतस्थळावर त्वरीत नाव नोंदणी करून घ्यावी. उमेदवारांनी ऑनलाईन नांव नोंदणी केल्यानंतर उमेदवारांना मिळालेल्या युझर आयडी व पासवर्डच्या अनुषंगाने विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सुविधांचा आणि माहितीचा देखील उमेदवारांना लाभ घेता येतो.
तरी उमेदवारांनी आयोजीत करण्यात आलेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयाशी कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२५७-२९५९७९० वर संपर्क साधावा. असेही श्री. मुकणे यांनी कळविले आहे.