‘तेल म्हणाले तुपाला तुझे कसं चाललंय’लेखक गोकुळ बागूल

तेल म्हणाले तुपाला
तुझे कसं चाललंय
पूर्वी शुद्ध तुपा खालोखाल
मीच असायचो
गोरगरिबांची दुधावरची
तहान ताकावर भगवायचो
क्रियाकर्म असो वा लग्नाची वरात
बुंदी -जलेबी ची माझ्यामुळेच
भरते परात
म्हणूनच तुझा माझा जमला मेल
जुना काळ तो बरा होता
छोटीशी ती तेल घाणी
शुद्धतेची असायची हमी
ग्राहक असायच्या दुकानदाराचा देव
आता मात्र दुकानदारीचे फुटले पेव
जागतिकीकरणाचे वारे फिरले
शेंग तेलाच्या पाकिटावर फक्त शेंगदाण्याचे चित्र
आत मात्र पाम तेल सर्वत्र…!
शुद्ध तुपाच्या नावाने अशुद्ध खाता
जाहिरातीमध्ये फुकटच्या बाता..
मी असलो डालडा तरी
देव्हार्‍यातील वात माझ्यामुळे जळते बरी
ग्राहक तो राजा असेल। त्याला कोणी वाली
थोडा प्रकाश पडेल कोणी महाबली..
आता विश्वास असा उरला नाही
लाच लुचपत खोरांना चराऊ कुरण
आता फक्त एकच आशेचा किरण
क्रिकेटच्या मैदानावर जसा असतो तिसरा पंच
ग्राहक राजा घाबरू नको केवळ तुझ्यासाठी आहे ” ग्राहक मंच..!”

गोकुळ बागुल
21, टेलिफोन कॉलनी
मु.पो. ता.अमळनेर
जि. जळगाव
पिन 425401
मो.9422276140