पर्यटन विकासासह शेती सिंचनासाठी लवकरच उतावळी नदी बहुळाला जोडणार-आमदार किशोर आप्पा पाटील
नांद्रा (ता.पाचोरा) ता.२०
पाचोरा तालुक्यातील बिल्दी येथील बहुळा धरणा लगत असणाऱ्या सुमारे चार एकर मध्ये पाच कोटी रुपयांचा काही दिवसांपूर्वी नामकरण केलेल्या “कृष्णा सागर” पार्कचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर प्रांताधिकारी डॉ.विक्रमजी बादल, तहसीलदार कैलास चावडे,माजी जि. प. सदस्य रावसाहेब पाटील, माजी जि प सदस्य मधुभाऊ काटे, माजी जि प सदस्य पदमसिंह पाटील,कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम जळगाव प्रशांत कुमार येळाई,सार्वजनिक बांधकाम विभागाचे डी. एम. पाटील,एस. एस .पी. कंट्रक्शन संजय शांताराम पाटील,मार्केट कमिटीचे शिवदास पाटील, डॉ.भरत पाटील,स्व.के.एम .बापू यांचे सुपुत्र अनिल पाटील व नातू जयदेव पाटील, अनिल धना पाटील, माजी प. स.सदस्य पंढरीनाथ पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल,माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, राजेंद्र तायडे ,नंदू सोमवंशी, किशोर बारावरकर,योगेश पाटील, बहूळाचे अभियंता नंदकुमार शेवाळे ,राम केसवानी, माजी सभापती सुभाष पाटील, चंद्रकांत धनवडे गणेश पाटील, सुभाष तावडे, शिवाजी तावडे, बिल्दी उपसरपंच निलेश पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रवीण ब्राह्मणे, प्रास्ताविक माजी जि. प. सदस्य रावसाहेब पाटील तर आभार गणेश पाटील यांनी मानले. तहसीलदार कैलासजी चावडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की आमदार किशोर आप्पांनी स्वर्गीय के.एम. बापूंचे नाव या ठिकाणी या पर्यटन स्थळला देऊन मनाचा केलेला मोठेपणाला लोक कायम स्मरणात ठेवतील याविषयी त्यांचे अभिनंदन केले . त्यानंतर या संपूर्ण पर्यटन स्थळाचा आर्किटेक प्लॅनिंग सुजित कुमार वर्मा यांनी समजावून सांगितला त्यामध्ये नैसर्गिक वातावरणात व संपूर्ण लेव्हल करून, पेव्हर ब्लॉक ,हॉर्टिकल्चर, लँडस्केपिंग गार्डन , पाण्याचा धबधबा,चौपाटीची व्यवस्था तेथे खाद्यपदार्थांचे दुकाने ,अत्याधुनिक स्वच्छतागृह,प्रशस्त वाहनतळ असा एकत्रित हा पूर्ण साडेतीन ते चार एकर मध्ये प्रकल्प आपण साकारणार असल्याचे सांगितले. त्याबरोबरच मधुकर काटे यांनी या पर्यटनास्थळाची स्तुती करून अजून २० ते २५ कोटी अतिरिक्त निधी आमदार महोदयांनी आणून जामनेर पेक्षा भव्य दिव्य पर्यटन स्थळ येथे करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पर्यटना बरोबरच या ठिकाणी शेतीसिंचनालाही मुबलक पाणी मिळावे यासाठी परिसरातील खेड्यातील शेतकऱ्यांच्या कॅनल व पोटचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावून जेव्हा हे पर्यटन स्थळ उद्घाटन होईल तोपर्यंत मी अगोदरचा प्रलंबित असलेला उतावळी नदी बहुळा धरणाला जोडण्याचं २००७ ला के.एम .बापूंचे जे स्वप्न होतं ते मी निश्चित पूर्ण करणार असल्याचे सांगितले या ठिकाणी अजून स्वर्गीय के. एम.बापू यांचा व श्रीकृष्ण भगवान यांचा ही पुतळा बनवून कोकणाच्या धर्तीवरील सुंदर झाडे वेली,बागा निर्माण करून त्यासाठी अजून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडून २० ते २५ कोटी रुपये पुढील काही वर्षात आणण्याचे घोषणा केली याबरोबर शिवजयंती निमित्त प्रत्येक गावांना शिवस्मारकसाठीही तीन लाख रुपये देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली .याबरोबरच मत्स्यमारींसाठी मत्स्य पूरक व्यवसाय व बोटिंग व्यवस्था कशी करता येईल याविषयी योजना आणण्याचे सांगितले .यावेळी परिसरातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ,शेतकरी, शिवसेना पदाधिकारी, अधिकारी, सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य,शिवसैनिक व पत्रकार बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.