मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जळगाव जिल्हा दौरा
जळगाव : – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 16 फेब्रुवारी, 2023 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-
गुरुवार, दिनांक 16 फेब्रुवारी, 2023 रोजी दुपारी 2.30 मुंबई येथून विमानाने जळगाव विमानतळ येथे आगमन. हेलिकॉप्टरने भोकर, जि. जळगाव हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 2.55 वाजता भोकर हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण.
दुपारी 3.00 वाजता भोकर, ता. जि. जळगाव येथे तापी नदीवरील उंच पुल व जोड रस्त्याचे भूमिपूजन (रु. 150 कोटी) व पुढीलप्रमाणे विविध कामांचे ई-भूमीपूजन व लोकार्पण 1) शिवाजी नगर येथील कि.मी. 420/9/11 वरील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण- रु. 25 कोटी. 2) मोहाडी (जळगाव) येथे 100 खाटांचे स्त्री रुग्णालयांचे बांधकाम करणे- रु.75 कोटी 31 लाख. 3) म्हसावद येथील रेल्वे उड्डाणपुलाचे भुमीपूजन रु. 35 कोटी. 4) जळगाव म.न.पा. हद्दीतील व वैशिष्ट्यपूर्ण अंतर्गत रस्त्यांच्या कामांचे भुमीपुजन- रु. 42 कोटी. 5) बांभोरी येथील गिरणा नदीवरील मोठया पुलाचे बांधकाम-रु. 40 कोटी. 6) धरणगाव तालुक्यात विविध ठिकाणी रस्ते डांबरीकरण व पुलाचे बांधकाम-रु. 57 कोटी. 7) जळगाव व धरणगांव तालुक्यातील तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र विकास कामे- रु. 25 कोटी. 8) जळगाव येथे धर्मादाय आयुक्त कार्यालय इमारत बांधकाम-रु. 4 कोटी. 9) धरणगाव येथे पशुसंवर्धन दवाखाना इमारत बांधकाम-रु. 4 कोटी.
सायंकाळी 5.15 वाजता भोकर येथून मोटारीने भोकर हेलिपॅडकडे प्रयाण. सायंकाळी 5.20 वाजता भोकर हेलिपेंड येथे आगमन व हेलिकॉप्टरने टेहू, ता. पारोळा हेलिपॅडकडे प्रयाण. सायंकाळी 5.40 वाजता टेहू, ता. पारोळा हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने एन.ई.एस. हायस्कूल पटांगण, पारोळाकडे प्रयाण. सायंकाळी 5.55 वाजता एन.ई.एस. हायस्कूल पटांगण, पारोळा येथे आगमन. सायंकाळी 6.00 वाजता एन.ई.एस. हायस्कूल पटांगण, पारोळा येथे विविध विकास कामांचे भूमीपुजन व जाहीर मेळावा. सायंकाळी 7.30 वाजता राखीव, रात्री 8.00 वाजता एन.ई.एस. हायस्कूल पटांगण, पारोळा येथून मोटारीने जळगाव विमानतळाकडे प्रयाण. रात्री 9.00 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण.