“बाला”चा पाचोरा पॅटर्न संपूर्ण राज्यात राबवला जावा आमदार किशोर आप्पा पाटील.
लासगाव येथे”बाला “उपक्रमा अंतर्गत तालुकास्तरीय प्रेरणा सभा
नांद्रा( ता.पाचोरा)या.११लासगाव जि.प.शाळेत “बाला”उपक्रमाचे उद्घाटन आमदार किशोर आप्पा पाटील यांचा हस्ते करण्यात आले.जि.प.शाळा भौतिक दुष्ट्या समूद्ध करण्यासाठी लातुर पॅटर्न राबवली जात आहे.आपल्या तालुक्यातील शाळा अशा बनवा कि संपूर्ण राज्यात पाचोरा पॅटर्न ने हि योजना राबविण्यात आली पाहिजे अशा शाळा संपन्न करा, शाळांना भरीव निधी मंजूर केला असल्याची माहिती आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केले.व्यासपीठावर जि.प.सदस्य पदमबापु पाटील, बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख सुनिल पाटील मनोज पाटील,खलील देशमुख,डि.के.पाटील, इम्रान शेख, समाधान पाटील, डॉ.हादी देशमुख, साहेबराव पाटील,वहिद देशमुख,राजु तायडे, गोपाल पाटील , गटशिक्षणाधिकारी गिरीश जगताप,शालेय पोषण आहाराचे तालुका समन्वयक सरोज गायकवाड,सुनिल पाटील (तारखेडा), आबासाहेब पाटील, पंकजसिंग पाटील, नानाभाऊ पाटील , स्वप्निल बाविस्कर, किरण सोनार,नांद्रा जि.प.शाळेच्या मुख्याध्यापीका मोहिनी पाटील ,लासगाव जि.प.शाळेच्या मुख्याध्यापीका सुनंदा पाटील,दिपक पाटील,पत्रकार राजेंद्र पाटील,प्रा.यशवंत पवार, बाबुलाल पटेल यांच्या सह तालुक्यातील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व लासलगाव जि.प.शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.