एम. एम. महाविद्यालयात व्यक्तिमत्त्व विकास विषयावर एक दिवसीय व्याख्यान संपन्न
*पाचोरा दि. 11 -* श्री. शेठ मु. मा. साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथील निलया फौंडेशन, वाणिज्य व अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘व्यक्तिमत्त्व विकास’ विषयावर निलया फौंडेशनचे डॉ. अविनाश शिरसाट यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. यामध्ये सॉफ्ट स्किल, व्यक्तिमत्व विकास, रोजगाराच्या संधी तसेच नविन तांत्रिक ज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. शिरीष पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर उपप्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवले.
यावेळी कार्यक्रमाला प्रा. डॉ. जे. डी. गोपाळ, डॉ. के. एस. इंगळे, डॉ. एस. बी. तडवी, प्रा. योगेश पुरी, प्रा. गौतम निकम, प्रा. विशाल पाटील, प्रा. स्वप्नील भोसले, प्रा. अक्षय शेंडे, प्रा. नितीन पाटील, श्री. एम. पी. जाधव, श्री. जावेद देशमुख, शिक्षकेतर कर्मचारी व 112 विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. सरोज अग्रवाल व आभार डॉ. एस. बी. तडवी यांनी मानले.