***_🙏🏻”मला भेटलेला* विद्यार्थी_ “🙏🏻*
*लेखन: – सौ.ललिता पाटील. पाचोरा…***
फेब्रुवारी ,मार्च महिना म्हटला की सर्व विद्यार्थ्यांमध्ये परीक्षांची लगबग दिसून येते…. वर्षभर शाळा कॉलेज विविध प्रकारचे ऑनलाईन , ऑफलाईन क्लासेस या सर्व गोष्टींमुळे विद्यार्थ्याचे अवस्था अगदी ओझे वाहनाऱ्या बैला सारखी झालेली असते… परंतु या सर्व स्पर्धांना सामोरे जायचे म्हणजे हे सर्व करावेच लागणार याला पर्याय नाही……. अगदी काल परवा माझ्या काही माजी विद्यार्थ्यांनी घरी येऊन भेट घेतली त्यांनी त्यांचे मनोगत माझ्यापुढे व्यक्त केले खरंच आपण भावी पिढीला काय देत आहोत याबद्दल जरा माझ्या मनात भीती आणि चिंता व्यक्त झाली तीच मी आपल्या सर्वांसोबत शेअर करू इच्छिते प्रत्येक पालकाने जरूर एकदा वाचावं अशी मी अपेक्षा करते….
खरंतर पालकांच्या महत्त्वकांक्षामुळे मुलांचं मानसिक खच्चीकरण होत तर नाही ना यावर जरा विचार करायला हवा, मान्य आहे स्पर्धा आहे, भविष्याचा प्रश्न आहे परंतु आपण ज्या गोष्टीच ओझं आपल्या मुलांच्या मनावर देत आहोत ते पेलण्या इतपत आपलं मूल सक्षम आहे का याचा एकदा नक्कीच विचार व्हावा एक वेळेस पाठीवरचं ओझं पेलवलं जातं परंतु मनावर असणाऱ्या ओझ्याचं काय…. पालक सहजच म्हणून जातो की माझी काही स्वप्न होती मला भविष्यात अमुक अमुक व्हायचं होतं परंतु परिस्थिती अभावी मला शक्य झाले नाही म्हणून मी माझी स्वप्न माझ्या मुलांच्या माध्यमातून पूर्ण करू इच्छितो .., परंतु याच वेळेस त्या मुलाची इच्छा काय आहे याचा आपण विचार करतो का आता परिस्थिती अशी आहे पैसा ही गोष्ट गौण झाली आहे लाखो रुपये फीज भरून क्लासेस लावले जातात काही ठिकाणी तर परिस्थिती नसताना देखील हे पाऊल उचलले जाते जर कुठेतरी त्या विद्यार्थ्यांच्या मनात ही भीती असेल की आपल्या आई-वडिलांनी एवढा खर्च केला आहे आपण जर त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही तर…. हया तरचीच भीती प्रत्येक पालकाला आणि पर्यायने विद्यार्थ्याला धास्तावून टाकते त्यामुळे एकतर ते मुल अतिशय बिनधास्त होते किंवा मानसिक तणावाखाली वावरत असते आणि दुर्दैवाने जर काही विपरीत निकाल लागला तर…..?? हा प्रश्न गंभीर आहे, याचा नक्की विचार केला पाहिजे आपण आपली भावी पिढी कशी घडवत आहोत यावर जरा विचार करायला….. बऱ्याच सुख वास्तू कुटुंबांमध्ये मुलाला अगदी लहानपणापासून कुठल्याच गोष्टीची कमतरता नसते अगदी पहिल्या वाढदिवसाला गिफ्ट म्हणून बऱ्याच वस्तू भेट स्वरूपात दिल्या जातात त्यानंतर प्रत्येक वाढदिवसाला त्या पाल्याची अपेक्षा वाढतच जाते आणि पर्यायाने फक्त घेण्याची वृत्ती त्याच्यामध्ये बळावते… आणि वयाच्या पंधरा-सोळा वर्षापर्यंत ते अगदी निर्भीड होऊन जाते आणि त्याच वेळेस जर एखादी भेटवस्तू देण्यास नकार दिला तर त्याचे मन या नकाराला पचवण्यास तयार नसते कारण त्याला लहानपणापासून नकार शिकवलेलाच नसतो किंवा त्या शब्दाची ओळखच झालेली नसते त्यामुळे ही पद्धती आधी बदलली पाहिजे… घेण्यापेक्षा देण्याची सवय अधिक लावली पाहिजे त्यामुळे त्याची आनंदाची व्याख्या बदलेल हे बदल लगेच घडून येणारे नसतात हे लहानपणापासून मुलांवर संस्कार घडवताना द्यावयाचा एक सुंदर वारसा असतो….
पूर्वी विद्यार्थी शिकत होता घडत होता घडता घडता पडत देखील होता परंतु त्याच्यामध्ये स्वतः सावरण्याची ताकद असायची.. हल्ली काय झाले आहे शिक्षण पद्धती बदलली आहे त्याचबरोबर अपेक्षाही वाढल्या आहेत..सगळ्यात मोठ फॅड आहे की आपलं मूल डॉक्टर झालं पाहिजे..अहो सध्या पास आऊट झालेल्या डॉक्टरांची परिस्थिती तर जाऊन बघा…. मला भेटलेल्या त्या विद्यार्थ्याचं हेच म्हणणं होतं की टीचर माझे मम्मी पप्पा दहावीच्या परीक्षे नंतर मला बाहेरगावी क्लासेस साठी पाठवत आहे माझी जाण्याची मुळीच इच्छा नाही, क्लासची फी खूप जास्त आहे त्यासाठी पप्पा लोन घेत आहेत जर मी परीक्षेत चांगले मार्क पाडू शकलो नाही तर पप्पांचं मोठं नुकसान होईल हे त्या बालिश मनाचे प्रश्न होते परंतु मी त्याला कोणतेही खोटे आश्वासन देऊ शकत नव्हती,,त्यामुळे मी तुझ्या आई वडिलांशी बोलेल हे सांगून परत पाठवले… खरंच यावर तुमच्याकडे काही उत्तर असेल तर मला नक्की कळवा….. ह्या सर्व ओझ्या मुळे आपल्या पाल्याचे बालपण तर कुठेच हरवून गेले आहे.., पूर्वीसारखे मैदानी खेळ खेळताना मुलं पटांगणावर दिसत नाहीत कारण सर्व गोष्टी त्यांना आज ऑनलाईन उपलब्ध होत आहे भरपूर सारे प्रश्न आहेत पुन्हा एखाद वेळेस ह्याच प्रश्नांवर चर्चा होईल परंतु कुठलाही निर्णय घेण्याआधी आपल्या पाल्याचं मन जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करा हीच माझी सर्व पालकांना आवर्जून विनंती आहे त्यासाठी हा छोटासा लेख लिहिण्याचा प्रयत्न 🙏🙏
सौ ललिता ताई पाटील….प्रतिक्रिया कळवण्यासाठी…9922092896 🙏