भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त श्रृद्धांजलि अर्पण,
” दिल तो पागल है” हा गीतांचा कार्यक्रम संपन्न.
अमलनेर-(जळगाव)
भारत रत्न स्व.लता मंगेशकर यांच्या प्रथम पुण्यतिथि दिनाच्या निमित्ताने लता दीदी यांच्या अविस्मरणीय, सदाबहार गाण्यानी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दाभाड़े कॉम्प्लेक्स मधे आयोजित या कार्यक्रमात लता दीदीं ची एकल तसेच रफी साहब , किशोर कुमार, मुकेश यांच्या सोबत गायलेली सुपरहिट गाणी सादर करण्यात आली. यात ,,,
“ये शमा समा है प्यार का,
रहे न रहे हम महका करेगें,
तुम्ही मेरी मंजिल तुम ही मेरी पूजा,
मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी कभी,
दिल ढूंढता है फिर वही फुरसत के रात दिन,
इक प्यार का नगमा है,
आजा सनम मधुर चांदनी में,
यूं ही तुम मुझसे बात करती हो, अगर तुम न होते,
दिल दीवाना बिन सजना के माने ना,,,
यासारखी सदाबहार गाण्यांचा समावेश होता.
सुप्रसिद्ध गायक संजय अहिरे, शुभांगी खंडाले, साधना पाटिल तसेच सेंट्रल बैंक अमळनेर चेअधिकारी सुनील सोन्हिया , दयाकृष्ण सनवाल, यांनी आपल्या सुमधूर आवाजात ही गाणी म्हटली.
Ya प्रसंगी अमळनेर के संगीत प्रेमी, भाऊसाहेब देशमुख,दिलीप सोनवणे, चारू सनवाल, रविंद्र सिंह खंडाले, रमन कवड़े, भूषण सोनवणे,
अशोक शर्मा, उमेश पाटिल, किशोर धनगर, प्रकाश भावसार,
दीपक भावसार इत्यादी उपस्थित होते. दया कृष्ण सनवाल यांनी लता दीदी यांच्या गायन क्षेत्रातील अमूल्य योगदाना विषयी विचार मांडले. असे म्हटले जाते की,
दिवसाचे चोवीस तासात रेडियो ,टीव्ही या माध्यमातून कुठे ना कुठे लतादीदींचा आवाज आपल्या कानावर पडतोच.इतकी अफाट कामगिरी त्यांचा गोड गळ्यातून साकारली आहे.
संजय अहिरे यांनी सर्व उपस्थित संगीत प्रेमी यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील सोन्हिया यांनी केले.