जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत मुलांमध्ये झि.तो.म.विद्यालय,(धानोरा) तर मुलींमध्ये सरदार एस.के.पवार,(नगरदेवळा) संघास विजेतेपद…..!!!!!
जळगाव (वार्ताहर) – श्री गणपतराव पोळ क्रीडा विकास प्रबोधिनी,जळगाव,आयोजित,स्व.लक्ष्मण धुडकू पाटील,स्मृती प्रित्यर्थ १४ वर्षाआतील जिल्हास्तरीय आंतरशालेय खो-खो (मुले व मुली) स्पर्धेचे आयोजन दिनांक ३ ते ५ फेब्रुवारी २०२३ दरम्यान जळगाव जिल्हा खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने,जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा खेळांडूच्या मोठ्या उत्साहात पार पडल्या.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे….!!!
*मुले*
प्रथमस्थान – झि.तो.म.विद्यालय (धानोरा)
द्वितीयस्थान – शासकीय माध्यमिक आश्रमशाळा,(चांदसर)
तृतीयस्थान – कै.ओ.गो.पाटील माध्यमिक विद्यालय,(बिडगाव)
*वैयक्तिक कामगिरीत सरस ठरलेले मुले….!!!!*
उत्कृष्ट संरक्षक – आर्यन पावरा (शा.मा.आ.शाळा,चांदसर)
उत्कृष्ट आक्रमक – मानव गुजर (झि.तो.म.वि.धानोरा)
अष्टपैलू खेळाडू – कृष्णा माळी (झि.तो.म.वि.धानोरा)
*मुली*
प्रथमस्थान – सरदार एस.के.पवार विद्यालय (नगरदेवळा)
द्वितीयस्थान – आर.आर.विद्यालय,जळगाव
तृतीयस्थान – झि.तो.म.विद्यालय (धानोरा)
*वैयक्तिक कामगिरीत सरस ठरलेल्या मुली…!!!!!*
उत्कृष्ट संरक्षक – प्रणाली हवालदार (आर.आर.विद्यालय,जळगाव)
उत्कृष्ट आक्रमक – समीक्षा सावंत (सरदार एस.के.प.विद्यालय,नगरदेवळा)
अष्टपैलू खेळाडू – हेमांगी महाजन (सरदार एस.के.पवार,नगरदेवळा)
बक्षीस वितरण समारंभास जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षीत,जिल्हा क्रीडा संघाचे अध्यक्ष रजनीकांत कोठारी,जिल्हा खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष उदय पाटील,शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त गणपतराव पोळ,स्पर्धेचे प्रायोजक नामदेव लक्ष्मण पाटील,नंदलाल लक्ष्मण पाटील,नामदेव सोनवणे,जयांशु पोळ आदि ऊपस्थित होते,धैर्यसिंग राजपूत यांनी मनोगत व्यक्त केले.
बक्षीस वितरण समारंभाचे सुत्रसंचालन महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सहसचिव जयांशु पोळ यांनी केले तर आभार नंदलाल पाटील यांनी मानले,स्पर्धा यशस्वी होणेसाठी स्पर्धा प्रमुख गुरुदत्त चव्हाण,नामदेव सोनवणे,अनंता समदाणे,अनिल माकडे,राहुल पोळ,चंद्रकांत महाजन आदिंच्या मार्गदर्शनाखाली विजय क्षीरसागर,स्वप्निल चौधरी,महेश पाटील,रोहीत महाजन,प्रेमचंद चौधरी,दिलीप चौधरी,दत्ता महाजन,हेमंत ठाकूर,निरंजन ढाके,विशाल पाटील ,तुषार सोनवणे,हर्षल बेडीस्कर,यश नेवे,गोपाल पवार,तेजस्विनी बोरसे,दिपिका पोळ आदि तसेच श्री गणपतराव पोळ क्रीडा विकास प्रबोधिनीचे खेळाडू मेहनत घेतली.