स्व.लक्ष्मण धुडकू पाटील,स्मृतीप्रित्यर्थ जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत खेळाडूंचा उत्साह शिगेला…!!!!!
जळगाव (वार्ताहर) – श्री गणपतराव पोळ क्रीडा विकास प्रबोधिनी,जळगाव,आयोजित,स्व.लक्ष्मण धुडकू पाटील,स्मृती प्रित्यर्थ १४ वर्षाआतील जिल्हास्तरीय आंतरशालेय खो-खो (मुले व मुली) स्पर्धेचे आयोजन दिनांक ३ ते ५ फेब्रुवारी २०२३ दरम्यान जळगाव जिल्हा खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने,जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या मैदानावर आयोजित करण्यात आल्या आहेत.
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मुलींच्या गटात आर.आर.विद्यालय,सिध्दीविनायक विद्यालय,झि.तो.म.विद्यालय (धानोरा),सरदार पवार विद्यालय (नगरदेवळा) तर मुलांच्या गटात श्रीराम विद्यालय,झि.तो.म.विद्यालय (धानोरा),ओ.गो.पा.विद्यालय (बिडगाव),शा.मा.आश्रमशाळा (चांदसर) या संघांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करीत आपली विजयी घौडदौड कायम ठेवत रविवारी होणाऱ्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
स्पर्धा यशस्वी होणेसाठी स्पर्धा प्रमुख गुरुदत्त चव्हाण,नामदेव सोनवणे,अनंता समदाणे,अनिल माकडे,राहुल पोळ,चंद्रकांत महाजन आदिंच्या मार्गदर्शनाखाली गोपाल पवार,यश नेवे,विजय क्षीरसागर,स्वप्निल चौधरी,महेश पाटील,रोहीत महाजन,प्रेमचंद चौधरी,दिलीप चौधरी,दत्ता महाजन,हेमंत ठाकूर,निरंजन ढाके,विशाल पाटील तेजस्विनी बोरसे,दिपिका पोळ आदि तसेच श्री गणपतराव पोळ क्रीडा विकास प्रबोधिनीचे खेळाडू मेहनत घेत आहे.