करिअर कट्टा’ उपक्रमाअंतर्गत आयोजित स्पर्धेत चोपडा महाविद्यालयास द्वितीय क्रमांकाचे उत्कृष्ट जिल्हास्तरीय महाविद्यालय पारितोषिक जाहीर
चोपडा: महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असणारा करिअर कट्टा हा उपक्रम राबविणाऱ्या महाविद्यालयांसाठी “करिअर कट्टा राज्यस्तरीय महाविद्यालयीन स्पर्धा २०२२-२३” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला.
या स्पर्धेत महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयास उत्कृष्ट जिल्हास्तरीय महाविद्यालयाचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर केले आहे.
महाविद्यालयात करिअर कट्टातर्फे वर्षभर विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षक तसेच शिक्षकेतर वर्गासाठी आर्थिक कार्यशाळेचे आयोजन, यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन, विविध सर्टिफिकेट अभ्यासक्रम तसेच चोपडा तालुक्यातील पोलीस भरतीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांसाठी ‘पोलीस-भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र’ सुरु आहे.
महाविद्यालयातील ‘करिअर कट्टाला’ जाहीर झालेल्या या पारितोषिकाबद्दल ‘करिअर कट्टाचे’ समन्वयक श्री.वाय.एन.पाटील व सह-समन्वयक श्री.ए.एच. साळुंखे यांचे महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष
ऍड.संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डॉ.सौ.स्मिताताई संदीप पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी,उपप्राचार्य श्री.एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.