३० वर्षीय विवाहितेचा सासरचे मंडळीकडून छळ केल्या प्रकरणी पतीसह ४ जणांविरोधात अमळनेर पोस्ट ला गुन्हा दाखल
अमळनेर प्रतिनीधी : ( पंकज पाटील )
अमळनेर शहरातील एका परिसरातील ३० वर्षीय विवाहितेचा सासरचे मंडळीकडून छळ केल्या प्रकरणी पतीसह ४ जणांविरोधात अमळनेर पोस्ट ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अधिक माहिती अशी कि , अमळनेर शहरातील माहेर असलेले प्रियंका संदीप पाटील या महिलेचा विवाह बडवानी जिल्ह्यातील पानसेमल येथील बडगुन येथील संदीप केशव पाटील यांच्यासोबत झालेला आहे . विवाहितेस दि १० डिसेंबर २०१३ पासून सासरचे मंडळींनी लग्नामध्ये हुंडा कमी दिल्याच्या कारणावरून व माहेर हून एक लाख रुपये आणावे या नेहमी शिवीगाळ व मारहाण करीत घराबाहेर काढण्यास सांगितल्याच्या कारणावरून ३० वर्षीय विवाहितेने अमळनेर पोलीस स्थानकात पती संदीप केशव पाटील यांच्यासह ४ जणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे . पुढील तपास पोहेकॉ . चंद्रकांत पाटील हे करीत आहेत .