30 व 31 जानेवारी रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन
जळगाव . : – जिल्ह्यातील सुशिक्षित बरोजगारांना रोजगाराची संधी मिळण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, जळगाव यांच्यातर्फे 30 व 31 जानेवारी, 2023 रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी महाराष्ट्रातील नामांकित कंपन्यांनी एकूण 115 रिक्तपदे भरण्याविषयी कळविले आहे.
या मेळाव्यात ईच्छुक उमेदवारांनी सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा तसेच अल्पसंख्याक उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना अॅप्लाय करण्यासाठी सेवायोजन नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपल्या युजरआयडी व पासवर्डने लॉग-इन करून अॅप्लाय करावा. तसेच ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांनी विभागाच्या नमुद संकेतस्थळावर जाऊन नाव नोंदणी करावी व तदनंतर आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉग-इन करून अॅप्लाय करावा.
याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी 9.45 ते संध्या 6.15) या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक 0257-2959790 वर संपर्क साधावा. असे सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता वि. जा. मुकणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.