विज वितरण कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी संदीप पाटील तर व्हा.चेअरमन पदी सुलोचना पाटील
नांद्रा (ता.पाचोरा),महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या पाचोरा तालुका महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित पाचोरा या पतसंस्थेचे पदाधिकारी निवड करण्यासाठी दि.२२ रोजी सकाळी १२.०० वाजता तालुका निबंधक सहकारी संस्था तसेच निवडणूक निर्णय अधिकारी श्री.नामदेव सुर्यवंशी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत संपन्न झाली.
संघटनेचे परिमंडळ पतसंस्था नियंत्रण समिती चे प्रमुख जे.एन.बाविस्कर ,चेअरमनऑडिट कमिशन तथा व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या प्रमुख मार्गदर्शन व संघटनेचे परिमंडळ सचिव विरेंद्रसिंग पाटील, सर्कल सचिव प्रकाश कोळी, उपसर्कल सेक्रेटरी प्रकाश पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात नव निर्वाचीत पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.यावेळी संस्थेचे चेअरमन पदी संदीप युवराज पाटील तर व्हाईस चेअरमन पदी श्रीमती सुलोचना सुनिल पाटील,मानद सचिव पदी हाफिजोद्दीन सैफुद्दीन शेख या पदाधिकारी यांची सर्वानुमते एकमताने निवड करण्यात आली.
सुरूवातीला संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष दत्ताजी देशमुख यांच्या प्रतिमेस प्रमुख पदाधिकारी यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.संस्थेचे तत्कालीन व्हाईस चेअरमन आणि संघटनेचे एकनिष्ठ सभासद कै.रामदास दगडू ठोसर यांचे नुकतेच दु:खद निधन झाले त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली
प्रमुख पदाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले.संघटनेचे परिमंडळ सचिव विरेंद्रसिंग पाटील यांनी संघटनेचे वतीने नवनिर्वाचित पदाधिकारी यांना संघटनेचे ध्येय धोरणे व नेतृत्वचे निर्देश नुसार पुढील वाटचालीसाठी व कार्यक्रम साठी अत्यंत जागृत राहून अपेक्षित काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.संघटनेचे त्रैवार्षिक अधिवेशन नाशिक येथे दि.१०/११/१२ फेब्रुवारी २०२३ रोजी नाशिक येथे होऊ घातले असून त्यामध्ये सहभागी होऊन आपला सक्रीय सहभाग नोंदवणे अत्यावश्यक आहे असे प्रतिपादन केले.जे.एन.बाविस्कर यांनी मनोगत व्यक्त करताना संघटनेने दिलेल्या जबाबदारी ची जाणीव ठेवून कामकाज करणे क्रमप्राप्त असून नेतृत्व ला अपेक्षित असे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण सर्वांनी दक्ष राहावे असे आवाहन केले.बैठकीस उपस्थित सन्माननीय संचालक मंडळ तसेच सभासद पदाधिकारी म्हणून उत्तम जगन्नाथ पाटील,एम.बी.देशमुख,संदीप पाटील,वाल्मीक पाटील,हाफिजोद्दीन शेख,सुलोचना पाटील,विद्या बागुल,ज्ञानेश्वर पाटील,जगदीश महाजन,अशोक बंडू सुरवाडे,रमेश रामचंद्र सुर्यवंशी संस्थेचे कर्मचारी ज्ञानेश्वर पाटील यांची उपस्थिती होती.