महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ शाखा जळगाव जिल्हा कार्यकारिणीची सहविचार सभा संपन्न:-
🌈महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ शाखा जळगाव जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीचे आज श्री.सु.भा. पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे आयोजन करण्यात आले होते.
याबैठकीच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे जिल्हाध्यक्ष दादासो श्री अजित चौधरी सर होते. याप्रसंगीव्यासपीठावर ज्येष्ठ मार्गदर्शक श्री.सी.पा.पाटील, राज्य शिक्षकेतर प्रतिनिधी श्री देवेंद्रभाऊ चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष श्री मनोज पाटील, श्री महेंद्रसिगं पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष श्री राकेश पाटील, जिल्हा सहसचिव श्री सलिम तडवि, श्री योगेश चौधरी, जिल्हा शिक्षकेतर प्रतिनिधी श्री हितेश पाटील, पाचोरा तालुकाध्यक्ष श्री कमलाकर श्रीगणेश, शाळेचे मुख्याध्यापक श्री अशोक परदेशी आदी पदाधिकारी उपस्थित होते
बैठकीत विषय पत्रिकेवरील सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात येऊन खाजगी प्राथमिक शाळा व कर्मचारी यांच्या विविध समस्यांसंदर्भात लवकरच शिक्षण विभागातील अधिकारी वर्गासोबत एक सहविचार सभा घेऊन त्या समस्या सोडवण्यासंबंधीचे आश्वासन मा.जिल्हाध्यक्षांनी दिले. तालुका व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी विविध विषयावर आपली मते मांडलीत. या बैठकीत महासंघाच्या तालुका निहाय कामकाजाचा आढावा घेऊन तालुका निहाय समस्यांवर सविस्तर चर्चा झाली जळगाव जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शिक्षकांसाठी विविध स्पर्धा घेण्याचे व विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेप्रमाणे शालेय अभ्यासक्रमावर आधारित स्पर्धा परीक्षा घेण्याचे ठरले. तसेच प्रलंबित संचमान्यता, वेतनेतर अनुदान, लाईटबीलात सवलत, मुख्याध्यापक श्रेणी सुधार, सभासद संख्या वाढविणे, बाहेरील संस्था / संघटनांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना विरोध यांसारख्या विषयांवर चर्चा करण्यात आली ज्येष्ठ मार्गदर्शक श्री सि पा पाटील यांनी समारोपीय मार्गदर्शन करत महासंघाच्या कामकाजाचे कौतुक करत, समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी श्री देवेंद्र चौधरी यांची नुकतीच खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी एकमताने तसेच श्री अजय सोमवंशी यांची ग स सोसायटीच्या संचालक पदी बहुमताने निवड झाल्याबद्दल व श्री गणेश लोडते यांचा शिक्षकांसाठीच्या गीत गायन स्पर्धेत तृतीय क्रमांक आल्याबद्दल सत्कार करण्यात आला
बैठकीस जिल्हा कार्यकारिणीचे श्री कमलेश शिंदे, श्री अजय सोमवंशी, श्री कैलास तायडे, सौ सरला पाटील, श्री फयाज्जोद्दीन शेख, श्री मिर्झा आसिफ बेग, श्री नाना मोरे, श्री गोविंदा लोखंडे, श्री गणेश लोडते, श्री सुनील पवार, श्री धनंजय काकडे, श्री जयेश शिरसाठ, श्री सुनिल पाटील, श्री शशिकांत मालपुरे, श्री गुलाबराव महाजन, श्री बाळू पवार, श्री संजय बागुल, श्री आशिष पवार श्री राजेंद्र पाटील, श्री मोहन पाटील, श्री निखिल जोगी, श्री सुनिल पवार, श्री अविनाश घुगे, श्री सचिन चव्हाण, श्री अजित वानखेडे, श्री विकास पाटील, श्री समाधान महाजन, श्री महेश पाटील, श्री अरुण पारधी श्री सुधाकर पारधी, श्री सलीम तडवी, श्री खेमचंद खाचणे, श्री सुनील सोमवंशी हे सर्व पदाधिकारी, सर्व तालुक्यांचे तालुकाध्यक्ष, सचिव, कार्यकारिणी सदस्य, मुख्याध्यापक व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीचे सूत्रसंचालन श्री.मनोज पवार सर, प्रास्ताविक श्री.दीपक पाटील सर यांनी तर आभार श्री.राकेश पाटील सर यांनी मानले.
बैठकीच्या यशस्वीतेसाठी श्री स्वप्निल माने, श्री आशिष पाटील श्री धर्मराज पाटील तसेच सर्व तालुका कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य आणि श्री सु भा पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले