श्री.गो.से हायस्कूल, पाचोरा येथील वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

श्री.गो.से हायस्कूल, पाचोरा येथील वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

चला या नवीन वर्षाचे स्वागत करूया जुन्या स्वप्नांना पुन्हा नव्याने फुलवूया या.
पाचोरा ( प्रतिनिधी)
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से हायस्कूल ,पाचोरा. वार्षिक स्नेहसंमेलन 2022- 23 या दोन दिवशीय कार्यक्रमात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कलागुणास वाव निर्माण करण्यासाठी व प्रोत्साहित करण्यासाठी .श्री .गो.से हायस्कूलच्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम 2 जानेवारी ते 3 जानेवारी 2023 या दोन दिवसीय कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमात समारोप समारंभाचे अध्यक्ष पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार दिलीप वाघ.यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी विज्ञान प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध उपकरणे विज्ञान प्रयोग , सोलर उपकरणे, सुंदर व आकर्षक रांगोळी स्पर्धा, भव्य चित्रकला प्रदर्शन . अध्यक्षांनी कौतुक करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. भविष्यात सौर ऊर्जा बचत काळाची गरज आहे. असे माजी आमदार दिलीप वाघ यांनी मत व्यक्त केले. बक्षीस वितरण शुभहस्ते अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था. चेअरमन संजय नाना वाघ , शालेय समिती चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभाग प्रमुख चेअरमन वासुदेव महाजन.पाचोरा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक जितेंद्र वलटे, ज्येष्ठ संचालक सतीश चौधरी, जिजाबाई पाटील, श्री.गो. हायस्कूलचे माजी पर्यवेक्षक व पत्रकार शांताराम चौधरी, ध्येय न्यूजचे संपादक संदीप महाजन, पोलीस टाईम चे पत्रकार अनिल येवले, आकाश वाघ.शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला वाघ, उपमुख्याध्यापक एन. आर. पाटील, पर्यवेक्षक आर. एल .पाटील, ए.बी. अहिरे, सांस्कृतिक प्रमुख रहीम तडवी. तांत्रिक विभाग किमान कौशल्य विभाग प्रमुख.यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ जल्लोष साजरा झाला. सांस्कृतिक कार्यक्रमात फॅन्सी ड्रेस, सामूहिक नृत्य, नाट्यछटा, गीत गायन, बालनाट्य, चित्रकला, रांगोळी, विज्ञान प्रदर्शन ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांमधून प्रथम, द्वितीय, तृतीय, विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते शिल्ड प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले. यावेळी शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धा, संगीत खुर्ची अशा विविध स्पर्धा आयोजित करून वार्षिक स्नेहसंमेलनाचे उत्कृष्ट नियोजन करून समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. बी .बोरसे. एम. आर. पाटील, व कार्यक्रम सुरू असताना विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यासाठी शाळेतील शिक्षक मनोहर देसले, रवींद्र जाधव, प्रशांत नेनाव, शितल महाजन यांनी. उत्कृष्ट सूत्रसंचालन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले . तसेच गो.से .हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले पदार्थ अल्प दरात बनवून खाद्यपदार्थ बनवून कार्यक्रमासाठी आलेल्या पालक , विद्यार्थी ,शिक्षक शिक्षक कर्मचारी यांच्या सहकार्याने विशेषता शाळेचे संजय दत्तू सर यांच्या उत्कृष्ट नियोजनाचे विद्यार्थ्यांना उद्योगासाठी प्रोत्साहित करून बालवयात विद्यार्थ्यांना व्यवहाराचे नॉलेज व्हावे यासाठी प्रोत्साहित करून मार्गदर्शन केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन पर्यवेक्षक ए. बी. अहिरे. यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.